नवी दिल्ली : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नऊपैकी सहा खासदारांचा वेगळा गट स्थापन करून शिवसेनेत विलीन करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांना संख्याबळाअभावी खीळ बसल्याचे बुधवारी दिवसअखेर स्पष्ट झाले. या सहापैकी दोन खासदारांच्या बंडाबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून संख्याबळ नसताना ‘ऑपरेशन टायगर’ला मंजुरी न देण्याचे संकेत भाजप पक्षश्रेष्ठींनी शिंदे गटाला दिले. त्यामुळे महाराष्ट्रातील फुटीचा खेळ लांबणीवर पडला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौर्यानंतर ही मोहीम फत्ते केली जाईल, असा दावा सूत्रांनी केला आहे.
ठाकरे गटातील सहा खासदारांनी वेगळा गट बनवल्याचे पत्र लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे देण्यात आल्याची चर्चा बुधवारी दिवसभर रंगली होती. मात्र, असे कोणतेही पत्र बिर्ला यांना देण्यात आले नसल्याचा दावा वरिष्ठ सूत्रांनी केला. या कथित फुटीर खासदारांचा वेगळा गट करून तो शिवसेनेच्या शिंदे गटात सामील करून घेण्याच्या प्रयत्नांना गेल्या दोन दिवसांमध्ये वेग आला होता. मात्र, बुधवारी शिंदे गटाकडे किमान आवश्यक सहा खासदारांचा ‘कोरम’ जमवला नसल्याचे मानले जात आहे. सहा फुटीर खासदारांपैकी फक्त चार खासदारच दिल्लीत आले. उर्वरीत दोघांपैकी धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपण पुण्यात असल्याचा तर, संजय दिना पाटील यांनी आपण मुंबईत असल्याचा दावा केला. ठाकरे गटाने लोकसभेतील खासदारांसाठी व्हीप जारी केला असून गुरुवारी अकरा वाजता संसदेच्या पक्ष कार्यालयात बैठक बोलावली आहे. या बैठकीला पाटील उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संसदेमध्ये अत्यंत महत्त्वाची विधेयके संमत करण्यासाठी एनडीए सरकारला आघाडीतील खासदारांचे संख्याबळ वाढवण्याची गरज आहे. मात्र, कायद्याच्या कचाट्यात न अडकता अत्यंत सुरक्षितपणे ह्य्ऑपरेशन टायगरह्ण राबवण्यास भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी शिंदेंना बजावल्याचे समजते. तृणमूल काँग्रेसमधील खासदारांची फोडाफोडी करताना वापरलेली रणनीतीच ह्य्ऑपरेशन टायगरह्णबाबत राबवली जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तृणमूल काँग्रेसच्या फुटीर गटाकडे १९ खासदार होते मात्र, संख्याबळ २० झाल्याशिवाय म्हणजेच गट कायदेशीरदृष्ट्या पूर्णत: सुरक्षित झाल्यानंतरच या गटाला लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे वेगळा गट स्थापन करण्याचे पत्र घेऊन पाठवण्यात आले. त्याप्रमाणे ठाकरे गटाच्या सात फुटीर खासदारांनी एकत्र यावे व त्यानंतर वेगळा गट स्थापण्याचे पत्र बिर्लांना दिले जावे अशी ठाम भूमिका भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी घेतली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
संभाव्य फुटीर खासदारांपैकी संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे व नागेश पाटील आष्टीकर हे चौघे दिल्लीत असल्याचा दावा करण्यात आला. हे चौघे मंगळवारी रात्री दिल्लीत दाखल झाल्याचे सांगितले जात होते. या चौघांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री चर्चा केली व त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास शिंदे जयपूरला रवाना झाल्याचे समजते. मात्र, वेगळा गट निर्माण करण्यासाठी आणखी दोन खासदारांची गरज आहे. तेवढे संख्याबळ नसल्यामुळेच बुधवारची मोहीम लांबणीवर पडली. निव्वळ लेखीपत्र देऊन ‘ऑपरेशन टायगर’ पूर्ण होणार नाही तर किमान सहा खासदारांनी एकत्रितपणे बिर्लांची वैयक्तिक भेट घेणे आवश्यक आहे. ही संपूर्ण प्रक्रिया बुधवारी दिवसभरात पार पडणे अपेक्षित होते. मात्र, कथित फुटीर खासदारांपैकी एकाही खासदाराने वेगळ्या गट स्थापन करण्यासंदर्भात अधिकृतपणे भूमिका स्पष्ट केलेली नाही, हे विशेष.
ठोस आश्वासनाचा आग्रह
फुटीर खासदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असले तरी, त्यांना शिंदे गटाकडूनही ठोस आश्वासने हवी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. केंद्रीय मंत्रीपदावरूनही फुटीर खासदारांमध्ये वाद आहे. काही खासदार राजकीय गणिते साधण्याची वाट पाहात आहेत. या सगळ्या बाबींची पूर्तता आठवड्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे.
गटनेत्याचे लोकसभाध्यक्षांना पत्र
ठाकरे गटाचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत व लोकसभेतील खासदार अरविंद सावंत व अनिल देसाई या तिघांनी बुधवारी संसदेतील दालनात लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन ह्य्कॅव्हिएटह्ण दाखल केले. यासंदर्भातील लेखी पत्र सावंत यांनी मंगळवारी रात्री उशिरा ह्य्एक्सह्णवर प्रसिद्ध केले होते. हेच पत्र ठाकरेंच्या निष्ठावान खासदारांनी बिर्लांना दिले. हा वेगळा गट इतर कुठल्याही पक्षात समील होऊ शकत नाही. लोकप्रतिनिधी कायदा व पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार मूळ पक्ष अन्य पक्षात सामील व्हावा लागतो. तसे झालेले नाही. त्यामुळे कुठल्याही वेगळ्या गटाला मान्यता देण्याआधी आमचे म्हणणे ऐकून घ्यावे असे आम्ही बिर्लांना सांगितले आहे, असे खासदार अनिल देसाई यांनी सांगितले. केवळ दोनतृतीयांश सदस्य जमले म्हणून कोणी इतर पक्षात विलीन होऊ शकत नाही, असाही दावा अनिल देसाईंनी केला.
राजाभाऊ वाजे भावुक
नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी आपण ठाकरे गटाशी एकनिष्ठ असल्याचे स्पष्ट केले. बुधवारी सकाळी वाजे दिल्लीत दाखल झाले व ते संजय राऊत यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेमध्येही सहभागी झाले. या पत्रकार परिषदेमध्ये राजाभाऊ वाजे कमालीचे भावुक झालेले दिसले. वाजे दिवसभर दिल्लीतच होते, संसदीय समितीच्या बैठकीमध्ये ते सहभागी झाले होते. रविवारी मुंबईमध्ये ह्य्मातोश्रीह्णवर झालेल्या बैठकीमध्येही वाजे उपस्थित राहिले होते.
ठोस आश्वासनाचा आग्रह
फुटीर खासदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असले तरी, त्यांना शिंदे गटाकडून ठोस आश्वासने हवी असल्याचे समजते. केंद्रीय मंत्रीपदावरूनही खासदारांमध्ये वाद आहे. काही खासदार राजकीय गणिते साधण्याची वाट पाहात आहेत. या सगळ्या बाबींची पूर्तता आठवड्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे.
वर्धापनदिनाचा मुहूर्त हुकणार?
शिवसेनेच्या शुक्रवारी साजर्या होणार्या ६०व्या वर्धापनदिनी ठाकरे गटात फूट पाडण्याची शिवसेना शिंदे गटाची योजना होती. मात्र, संख्याबळ नसल्याने त्याला खीळ बसली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शुक्रवार व शनिवार दोन दिवस महाराष्ट्राच्या दौर्यावर आहेत. या दौर्याच्या काळातच ठाकरे गटातील फुटीची प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. त्यामुळे वर्धापनदिनी ठाकरेंना धक्का देण्याची खेळी तुर्तास अयशस्वी झाल्याचे दिसत आहे.
राजाभाऊ वाजे भावुक
नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी आपण ठाकरे गटाशी एकनिष्ठ असल्याचे स्पष्ट केले. बुधवारी सकाळी वाजे दिल्लीत दाखल झाले व ते संजय राऊत यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेमध्येही सहभागी झाले. या पत्रकार परिषदेमध्ये राजाभाऊ वाजे कमालीचे भावूक झालेले दिसले.
