Sanjay Raut Reaction on Bihar Election: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये एडीएला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. भाजपा, जद(यू) आणि लोजप (रामविलास) हे पक्ष एकत्रितपणे १९१ जागांवर आघाडीवर आहेत. तर महागठबंधनला सपशेल अपयश मिळताना दिसत आहे. सुरुवातीच्या या निकालांवर आता शिवसेनेचे नेते (संजय राऊत) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महागठबंधनला सुरुवातीच्या कलांनुसार अद्याप ५० जागाही मिळालेल्या नाहीत. काँग्रेसने अद्याप दोन आकडी संख्याही गाठलेली नाही. महाआघाडीच्या या अपयशावर संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

संजय राऊत आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणाले, “बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही
निवडणूक आयोग आणि बी जे पी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते! एकदम महाराष्ट्र पॅटर्न!”

त्यांना ५० च्या आत संपवले

संजय राऊत पुढे म्हणाले, “जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्याना ५० च्या आत संपवले!”

आश्चर्यकारक निकाल

बिहारमधील निकाल आश्चर्यकारक असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. “अशाप्रकारची परिस्थिती बिहारमध्ये नव्हती, असे आमचे मत आहे. वोट चोरीच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवली होती. निकाल समोर आले आहेत. निवडणुका निष्पक्ष वातावरणात व्हायला हव्या होत्या, त्या झालेल्या नाहीत”, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.