“शेतकऱ्यांच्या मृत्यूवर दु:खही व्यक्त केले नाही”; कृषी कायद्यांच्या घोषणेनंतर शिवसेना खासदाराचा मोदींवर निशाणा

केंद्र सरकारने तीनही नवीन कृषी कायदे मागे घेतले आहेत

Priyanka Chaturvedi targets narendra Modi

केंद्र सरकारने तीनही नवीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना ही मोठी घोषणा केली. या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन मोदींनी केले आहे. हे तीन कायदे मागे घेण्यासाठी शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरु आहे. यावर शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

शेतकऱ्यांना शुभेच्छा देताना त्यांनी ही लढाई दीर्घकाळ लढल्याचे प्रियांका चतुर्वेदी यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, “शेतकऱ्यांच्या संघर्षाचा हा विजय आहे. त्यांच्या आत्म्याला जिद्दीला मी सलाम करते. शेतकऱ्यांनी देशाला एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. सरकारमध्ये अहंकार भरला होता. शेतकऱ्यांच्या मृत्यूचे दु:खही सरकारला झाले नाही. लखीमपूर खेरी, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना मारहाण करण्यात आली. मात्र शेतकऱ्यांनी हार मानली नाही. याचा सामना सरकारला करावा लागला. शेतकरी मागे हटणार नाहीत, हे सरकारला कळले होते, त्यामुळे तीनही नवीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.”

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

आज गुरु नानक देवजींच्या प्रकाशाचा पवित्र सण आहे. आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी आंदोलक शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

प्रयत्न करूनही आम्ही काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताचे स्पष्टीकरण देऊ शकलो नाही. शेतकर्‍यांचाच एक वर्ग त्याला विरोध करत होता, पण आमच्यासाठी तो महत्त्वाचा होता. या शेतकऱ्यांनाही सर्वांनी समजावण्याचा प्रयत्न केला. अनेक माध्यमांतून चर्चा सुरू राहिली. शेतकऱ्यांचा युक्तिवाद समजून घेण्यात आम्ही कोणतीही कसर सोडली नाही, असे पंतप्रधान म्हणाले.

हेही वाचा – केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतले, पंतप्रधान मोदींची घोषणा

“आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, विशेषत: लहान शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, खेड्यातील गरिबांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, पूर्ण प्रामाणिकपणे, समर्पणाने शेतकऱ्यांसाठी हा कायदा चांगल्या हेतूने आणला आहे. आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, विशेषत: लहान शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, खेड्यातील गरिबांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, पूर्ण प्रामाणिकपणे, समर्पणाने शेतकऱ्यांसाठी हा कायदा चांगल्या हेतूने आणले,” असे पंतप्रधान म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shivsena mp priyanka chaturvedi targets narendra modi after announcing withdrawal of agriculture laws srk

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या