राजकीय नेतेमंडळी नेहमीच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप किंवा टक्के-टोणपे लगावताना दिसत असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये सौहार्दपूर्ण किंवा हलक्या-फुलक्या वातावरणात गप्पा दिसल्या, की सामान्य माणसाला देखील काही क्षण राजकारण विसरायला होतं. असाच काहीसा किस्सा मंगळवारी लोकसभेत घडला आणि सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरच्या सदस्यांमध्ये एकच हशा पिकला. हा किस्सा घडला शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या एका टोल्यामुळे! त्यांच्या टिप्पणीवर सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरच्या सदस्यांनी हसून दाद दिली आणि सभागृहातलं वातावरण काही काळ तणावरहीत झालं!

संसदीय अधिवेशनामध्ये मंगळवारी लोकसभेत बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याणमधील लोकल फेऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला. तसेच, एसी लोकलऐवजी नॉन एसी लोकलच्या पर्यायाविषयी देखील त्यांनी भूमिका मांडली. जवळपास १० मिनिटांच्या आपल्या भाषणाच्या अगदी सुरुवातीलाच श्रीकांत शिंदे यांनी लगावलेला टोला सदस्यांमध्ये हास्याची लकेर उमटवून गेला!

Thackeray group, Gaikwad,
कल्याणमध्ये ठाकरे गट आणि गायकवाड समर्थक छुप्या युतीच्या चर्चा ? भाजप आमदारांचा शिंदेंना पाठींबा, आमदार पत्नी मात्र ठाकरेंच्या उमेदवारासोबत
Rebellion in the Mahavikas Aghadi as well as Mahayuti Shiv Senas Dinesh Bub is Prahars candidacy
महायुती सोबतच महाविकास आघाडीतही बंडखोरी! शिवसेनेच्या दिनेश बुब यांना प्रहारची उमेदवारी
Rajan Vikhares challenge to Shinde group in Thane search for a candidate in Kalyan continues
ठाण्यात राजन विचारे यांचे शिंदे गटासमोर आ‌व्हान, कल्याणमध्ये उमेदवाराचा शोध सुरूच
virendra rawat congress candidate for haridwar
Loksabha Election 2024 : काँग्रेसचा रावत कुटुंबीयांवर विश्वास कायम; दोन पराभवांनंतरही हरिद्वारमधून उमेदवारी

नेमकं झालं काय?

लोकसभेच्या तालिका अध्यक्षांनी श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा उल्लेख केला आणि त्यांना बोलण्याची संधी दिली. श्रीकांत शिंदे बोलण्यासाठी उभे राहिल्यानंतर पुढच्या ३० सेकंदांमध्येच विरोधी बाकांवरच्या खासदारांनी तक्रार करायला सुरुवात केली. श्रीकांत शिंदे यांच्या मागे बसलेल्या खासदारांनी कॅमेऱ्यावर श्रीकांत शिंदे दिसत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांना ही बाब लक्षात आली.

श्रीकांत शिंदे यांनी यासंदर्भात लागलीच “अरे कॅमेरा दाखवा..कॅमेऱ्याला मी सापडत नाही बहुतेक”, असं म्हणत टोला लगावला. त्यावर सभागृहात हास्याची लकेर उमटली. काही क्षणांचा अवधी गेल्यानंतर लोकसभेतील कॅमेरा युनिटने श्रीकांत शिंदेंवर फोकस केला आणि स्क्रीनवर श्रीकांत शिंदे बोलताना दिसू लागले. यानंतरच विरोधी बाकांवरील खासदारांचं समाधान झालं!