Premium

“एक हजार कोटींचा महाल! ‘लहरी’ राजाच्या इच्छेखातर…” नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावरुन ठाकरे गटाची टीका

नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावरुन सामनाच्या अग्रलेखात टीका करण्यात आली आहे.

Thackeray Group Criticized Narendra Modi
अंधश्रद्धा मानणारे लोक नरेंद्र मोदींच्या अवतीभवती होते अशीही टीका ठाकरे गटाने केली आहे.

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचा दिमाखदार सोहळा दिल्लीमध्ये पार पडला. रविवारी साष्टांग दंडवत घालत आणि विधीवत पूजा करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना नव्या संसद भवनात प्रवेश केला. या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना निमंत्रण दिलं गेलं नसल्याने काँग्रेससह १९ विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला. या सोहळ्याला वादाची किनार लाभली. आता सामनाच्या अग्रलेखातूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात?

माणसाच्या स्वभावाला औषध नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असेच का वागतात? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे कष्ट कुणीही घेऊ नयेत. नव्या संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन भव्य स्वरुपात पार पडलं. हा सोहळा म्हणजे ‘सबकुछ मोदी’ असाच होता. फोटो आणि चित्रीकरणात इतर कुणाची सावलीही मोदी यांनी येऊ दिली नाही. तो त्यांचा स्वभाव आहे. राष्ट्रपतींनी नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले असते, त्यांच्याबरोबर लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती, दोघांच्या मधोमध पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या उजव्या बाजूला विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे असे चित्र लोकशाहीच्या मंदिरात दिसले असते तर मोदींचे मोठेपण कमी झाले नसते. मोदींनी हे सर्व घडवून आणले असते तर मोदी बदलले असेच जगाला वाटले असते, पण आपला स्वभाव बदलतील ते मोदी कसले? मोदी हे मोदींसारखेच वागतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena thackeray group criticized pm narendra modi on inauguration of new parliament scj