अलीगढ मदरशामध्ये संतापजनक प्रकार! लहानग्यांना साखळदंडांनी बांधून हीन वागणूक

‘या’ संतापजनक प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे.

Shocking Aligarh In Madrassa Children Were Kept in Thick Iron Chains gst 97
अलीगढ मदरशामध्ये लहानग्यांना साखळदंडांनी बांधून ठेवलं. (Photo : Representational/Indian Express)

अलीगढमधील मदरशातून एक अत्यंत धक्कादायक आणि तितकंच संतापजनक चित्र समोर आलं आहे. या मदरशामध्ये अवघ्या ५ ते ६ वर्षांच्या मुलांना जाड लोखंडी साखळीने बांधून ठेवण्यात येतं. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या मुलांना नेमकी कोणत्या कारणासाठी ही अघोरी शिक्षा देण्यात आली आहे आणि यामध्ये कोण कोण सामील आहेत? हे जाणून घेण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत.

अलीगढच्या तालीमुल कुराण थाना सासनी गेट, मोहल्ला-लाडिया या परिसरातील हे प्रकरण आहे. या संतापजनक कृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा ही बाब उघड झाली आहे. स्थानिकांच्या मते, या मदरशाचे मौलाना अतिशय कडक आणि क्रूर आहेत. ते अनेकदा मुलांना मारहाण देखील करतात. दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी मदरसा चालकाला ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये चार मुलांच्या हातात बेड्या दिसत आहेत. हा व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर सर्वप्रथम या व्हिडिओची सत्यता पडताळण्यात आली. त्यानंतर, जेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा एक मूल जाड लोखंडी साखळीने बांधलेलं त्यांना दिसलं. यानंतर पोलिसांनी या मदरशाचा संचालक फहीमुद्दीनला ताब्यात घेतलं.

स्थानिकांकडून मौलानावर गंभीर आरोप

पोलिसांनी या प्रकरणाची सत्यता जाणून घेण्यासाठी मुलांच्या पालकांना बोलवलं. स्थानिक लोकांनी याबाबतची तक्रार केली होती. स्थानिक लोकांच्या मते, या मदरशाचा संचालक मुलांकडून पैसे मागवतो. आणखीही काही गंभीर आरोप स्थानिक लोकांनी मौलानावर केले आहेत. तर दुसरीकडे, असं म्हटलं जातं की हे संपूर्ण प्रकरण एका भांडणामुळे झालं आहे. शेजाऱ्यांशी भांडण झालं आणि त्यानंतर ही तक्रार करण्यात आली असल्याचं म्हटलं जात आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपस करत आहेत. त्याचप्रमाणे, हा व्हिडिओ कधीचा आहे? हे देखील तपासले जात आहे.

२०१४ मध्येही असंच एक प्रकरण समोर आलं होतं. त्यावेळी देखील मुलांना अशाच पद्धतीने साखळदंडांनी बांधून ठेवण्यात आलं होतं. तेव्हा त्यापैकी बरेच जण तिथून पळून जाण्यात यशस्वी झाले होते. त्यानंतर, तो प्रकार उघडकीस आला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shocking aligarh in madrassa children were kept in thick iron chains gst

ताज्या बातम्या