धक्कादायक! घरच्यांना झोपेच्या गोळ्या देऊन मुलगी ३ तोळं सोनं घेऊन प्रियकरासोबत फरार

जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा त्यांनी पाहिलं की आपली मुलगी घरात नाही आणि घरातील सर्व काही विखुरलेलं आहे.

shocking-girl-eloped-with-boyfriend-after-giving-sleeping-pills-to-family-gst-97
हरियाणात एक अल्पवयीन मुलगी शेजारी राहणाऱ्या मुलासह रोख पैसे, सोनं-चांदी घेऊन पळून गेली.(Photo : ANI)
हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील किला पोलीस स्टेशन परिसरातील एका वसाहतीत एक अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथील एक अल्पवयीन मुलगी तिच्या शेजारी राहणाऱ्या मुलासह पळून गेली. यावेळी तिने घरातून चक्क ६५ हजार रुपये रोख, साडेतीन तोळे सोने आणि तब्बल ४० तोळे चांदीचे दागिने देखील आपल्यासोबत घेतले आहेत. पीडित वडिलांच्या तक्रारीवरून किल्ला पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू झाला आहे.

भाजीमधून खाऊ घातल्या झोपेच्या गोळ्या

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पीडितेच्या वडिलांनी सांगितलं की, ते एका कारखान्यात काम करतात. त्यांना तीन मुली आहेत. त्यांच्या दोन मुलींची लग्न झाली आहेत. तर सर्वात लहान मुलगी १७ वर्षांची आहे. या लहान मुलीने मंगळवारी रात्री कुटुंबातील सर्वांना भाजीमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळून खाऊ घातलं. त्यामुळे, ते आणि कुटुंबातील इतर सदस्य दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता उठण्याऐवजी सकाळी ९ पर्यंत देखील उठू शकलो नाही.

तरुणाने मुलीला आमिष दाखवलं! वडिलांचा आरोप

जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा त्यांनी पाहिलं की आपली मुलगी घरात नाही आणि घरातील सर्व काही विखुरलेलं आहे. पैसे आणि दागिने गायब होते. यापुढे तपासानंतर असं आढळून आलं की, शेजारचा एक तरुण देखील रात्रीपासून बेपत्ता आहेत. पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, आरोपी तरुणाने मुलीला आमिष दाखवून पळवून नेलं आहे. याविषयी आरोपींच्या नातेवाईकांशी बोलून देखील त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर किल्ला पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

पोलिसांचं आश्वासन

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पीडित कुटुंबाने सांगितलं की, आरोपीच्या नातेवाईकांना दोघांबद्दल माहिती आहे. मोबाईल लोकेशन ट्रेसिंग टाळण्यासाठी आरोपीचे नातेवाईक त्या तरुणाची सोशल मीडिया अ‍ॅपद्वारे कॉलवर बोलत आहेत. दरम्यान, पोलिसांनी मात्र या दोघांनाही तीन दिवसात शोधण्याचं आश्वासन दिलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shocking girl eloped with boyfriend after giving sleeping pills to family gst

ताज्या बातम्या