scorecardresearch

California Shooting: कॅलिफोर्नियातील शीख मंदिरासमोर गोळीबार; दोन व्यक्तींची प्रकृती गंभीर

California Gurdwara Firing: कॅलिफोर्नियाच्या सॅक्रामॅन्टोमध्ये शीख मंदिरासमोर गोळीबार!

California Stockton Gurdwara Shooting
कॅलिफोर्नियाच्या सॅक्रामॅन्टोमध्ये शीख गुरुद्वारासमोर गोळीबार! (फोटो – ट्विटरवरून साभार)

California Gurdwara Shooting: गेल्या काही दिवसांपासून खलिस्तान समर्थक वारीस पंजाब दे संघटनेटा म्होरक्या अमृतपाल सिंग फरार असून त्याचा शोध पंजाब पोलीस घेत आहेत. या अनुषंगाने खलिस्तान समर्थक संघटना आणि चळवळीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला असताना कॅलिफोर्नियाच्या सॅक्रामँटोमधील एका शीख मंदिरासमोर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना घडल्यानंतर यामध्ये खलिस्तानी समर्थकांचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. स्थानिक प्रशानाच्या हवाल्याने न्यूज १८ नं दिलेल्या वृत्तानुसार हा गोळीबार करणाऱ्या व्यक्ती जखमी व्यक्तींना ओळखतात, अशी माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी लंडनमधील भारतीय दूतावासाबाहेर खलिस्तानी समर्थकांनी गोंधळ घातला होता. तसेत, भारताचा तिरंगा खाली उतरवण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. या प्रकरणाचे तीव्र पडसाद भारतात उमटले होते. भारतानं आपली नाराजीही ब्रिटिश सरकारला कळवली होती. या पार्श्वभूमीवर कॅलिफोर्नियामध्ये घडलेल्या या घटनेमध्ये खलिस्तानी समर्थकांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिक पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास चालू असून गोळीबार करणाऱ्यांपैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. या घटनेसंदर्भातला एक व्हिडीओ शेखर पुजारी नावाच्या एका व्यक्तीने ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट केला आहे.

दोन्ही जखमी गंभीर

दरम्यान, या प्रकारामध्ये जखमी झालेल्या दोन्ही व्यक्तींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार चाालू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. हल्लोखोर आणि जखमी व्यक्ती एकमेकांच्या परिचित असल्याचं सांगितलं जात असलं, तरी हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. एका हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दुसरा हल्लेखोर फरार झाला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 08:35 IST

संबंधित बातम्या