खत तुटवडा… शेतकऱ्यांसमोरील नवीन प्रश्न; केंद्रीय मंत्री म्हणाले, “शेतकऱ्यांनी…”

भारतात डायअमोनियम फॉस्फेट (DAP) आणि म्युरिएट ऑफ पोटॅश (MOP) या खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

ऐन रब्बी पिकांची लगबग सुरू असताना देशातील शेतकऱ्यांसाठी काहीशी काळजी करणारी बातमी आहे. भारतात डायअमोनियम फॉस्फेट (DAP) आणि म्युरिएट ऑफ पोटॅश (MOP) या खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागील वर्षांच्या साठ्याच्या तुलनेत हा खतांचा साठा केवळ एक तृतीयांश आहे. त्यामुळे केंद्रीय रसायन आणि खते मंत्री मनसुख मांडविया यांनी शेतकऱ्यांना खतांचा साठा न करण्याचं आवाहन केलंय.

खत विभागाच्या आकडेवारीनुसार, सध्या देशात ३१ ऑक्टोबरपर्यंत डीएपीचा साठा १४.६३ लाख टन इतका आहे. हाच साठा मागच्या वर्षी म्हणजेच २०२० मध्ये ४४.९५ लाख टन आणि २०१९ मध्ये ६४ लाख टन इतका होता. एमओपीचा साठा ऑक्टोबर अखेर ७.८२ लाख टन इतका झालाय. २०२० मध्ये हा एमओपी साठा २१.७० लाख टन आणि २०१९ मध्ये २१.५२ लाख टन इतका होता.

युरियाचा मुबलक साठा उपलब्ध

डीएपी आणि एमओपीच्या साठ्यात काळजी करायला लावणारा तुटवडा असला तरी युरिया आणि नायट्रोजन (N), फॉस्फरस (P), पोटॅश (K), सल्फरयुक्त (S) इतर खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ऑक्टोबर अखेर या खतांचा साठा कमीच असला तरी तो अगदी तुटवड्याच्या स्तरावर नाही. सध्या या खतांचा साठा ५२.९० लाख टन आहे.

युरियाचा साठा मागच्या वर्षी २०२० मध्ये ७९.७६ लाख टन इतका होता, तर २०१९ मध्ये हाच साठा ७८.९५ लाख टन होता. दुसरीकडे सध्या एनपीकेएस (NPKS) साठा ३८.४० इतका असून मागच्या वर्षी हा साठा ३८.४०, तर २०१९ मध्ये ५२.१३ लाख टन इतका होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shortage of dap and mop fertiliser in india minister asks to not hoard pbs

ताज्या बातम्या