अफगाणिस्तानम ताब्यात घेतल्यानंतर तालिबान्यांच्या क्रूरतेचे किस्से सातत्याने समोर येत आहेत. काबुलमध्ये शुक्रवारी रात्री तालिबान्यांनी गोळीबार केल्यामुळे लहान मुलांसह अनेक लोक ठार आणि जखमी झाल्याची माहिती स्थानिक अफगाण वृत्तसंस्थेने दिली होती. दरम्यान, तालिबान्यांच्या अत्याचाराची आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अफगाणिस्तानमध्ये पोलीस खात्यात सेवा बजावलेल्या महिलेने तिच्यासोबत झालेल्या अत्याचाराची आपबीती सांगितली आहे. खातेरा हाशिमा, असे त्या महिलेचे नाव आहे.

अफगाणिस्तानच्या महिला पोलिसात सेवा दिलेल्या खातेरा हाशिमा यांनी सांगितले की, “तालिबान अजिबात बदलला नाही, अगदी २० वर्षांपूर्वी होता तसाच आहे. मी गर्भवती असताना देखील तालिबान्यांनी माझे अपहरण केले होते. त्यानंतर अत्याच्यार करत, माझ्या डोक्यात गोळ्या झाडल्या गेल्या आणि माझे डोळे बाहेर काढण्यात आले.”

महिलेचे घराबाहेर पडणे तालिबानच्या नजरेत पाप

खातेरा हाशिमा यांच्या मते, अफगाणिस्तानमध्ये कोणत्याही महिलेचे घराबाहेर पडणे तालिबानच्या नजरेत पाप आहे. जे खातेरा यांच्यासोबत घडले ते तिथल्या अनेक महिलांसोबत घडत आहे. त्या महिला बाहेर येऊ शकत नाहीत, कोणाला काही सांगू शकत नाहीत, असे खातेरा हाशिमा यांनी सांगितले. खातेरा सध्या भारतात आहेत पण अफगाणिस्तानात झालेल्या अत्याचाराबाबत सांगतांना त्यांचा अंगावर काटा उभा राहिला. त्या म्हणाल्या, इस्लामच्या नावाखाली तालिबान अफगाण लोकांना धमकावत आहे. खातेरा हाशिमा इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.

हेही वाचा – पाकिस्तानी झेंड्यात गुंडाळला सय्यद गिलानींचा मृतदेह; गुन्हा दाखल

वडिलांकडूनच मिळाला धोका 

खातेरा यांना त्यांच्या वडिलांनी अफगाण पोलिसात सामिल होण्यापासून रोखले होते. खातेरा यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना कळले की तिचे वडील तालिबानशी संलग्न आहेत. तिच्या वडिलांना खातेरावर होणाऱ्या अत्याचाराची माहिती होती. पण त्यांनी तिला वाचवले नाही. त्यामुळे मला वडिलांकडूनच धोका मिळाल्याचे खातेरा हाशिमा सांगतात. खातेरा हाशिमा यांनी सांगितले की, एक दिवस जेव्हा त्या कामावरून परत येत होत्या, तेव्हा तीन तालिबानी घराजवळ तिची वाट पाहत होते. त्यांनी खातेरावर हल्ला केला, चाकूने आठ ते दहा वेळा वार केले आणि गोळ्या झाडल्या. डोक्यात एक गोळी लागल्याने खातेरा बेशुद्ध झाल्या. त्यानंतरही तालिबान्यांनी क्रूरता दाखवली आणि त्यांनी खातराचे डोळे काढले.

हेही वाचा – पंजशीरमध्ये तालिबानच्या ७०० दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती; तालिबानी मात्र विजयाच्या दाव्यावर ठाम

दृष्टी कायमची गेली

खातेरा यांनी सांगितले की, या हल्ल्यानंतर ती जिवंत मृतदेह बनली आहे. हल्यानंतर तिला काबूलच्या एका रुग्णालयात नेण्यात आले होते. जेथे डॉक्टरांनी त्यांचा जीव वाचवला. पण त्यांची दृष्टी कायमची गेली आहे. खातेरा म्हणतात की, आज मी श्वास घेत आहे, पण एकेक दिवस घालवणए माझ्यासाठी संघर्षापेक्षा कमी नाही. दैनंदिन आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी करणे सुद्धा माझ्यासाठी एक आव्हान बनले आहे.

आजही तालिबानी माझ्या शोधात

खातेरांना चांगल्या उपचारासाठी भारतात आणले होते. त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये परिस्थिती बिकट होत गेली आणि त्या इथेच आहे. तर त्यांचे कुटुंब अजूनही अफगाणिस्तानात आहे. हाशिमा यांनी सांगितले की मला माझ्या मुलांची काळजी आहे, परंतु ती अफगाणिस्तानात परत जाऊ शकत नाही. तालिबानला मी जिवंत असल्याचं कळलंय आणि ते मला शोधत आहेत. आजही तालिबानी माझ्या घरी जाऊन माझ्या मुलांना धमकी देत आहे, असे खातेरा यांनी सांगितले.