दिल्ली-मेरठ महामार्गावर एका महिलेस प्रायव्हेट पार्ट (गुप्तांग) दाखवून पळ काढणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेश पोलिसांनी गुरुवारी अटक केली. संबंधित आरोपी सीआरपीएचा निवृत्त जवान आहे. ९ सप्टेंबर रोजी आरोपी दिल्ली-मेरठ महामार्गावर नहल गावाजवळ लघुशंका करण्यासाठी रस्त्याच्या बाजुला उभा होता. लघवी केल्यानंतर आरोपीनं शेतात काम करणाऱ्या दोन महिलांना प्रायव्हेट पार्ट दाखवत अश्लील हावभाव केले. यानंतर एका महिलेनं आरोपीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पण महामार्गावरून येणाऱ्या एका कारच्या धडकेत पीडित महिलेचा मृत्यू झाला.
पोलिसांनी वृत्तसंस्था ‘पीटीआय’ला दिलेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला. पीडित महिलेनं आरोपीला दुचाकीवरून पळून जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपी अंकित चौधरी याने पीडितेला रस्त्यावर ढकललं. यावेळी पाठीमागून आलेल्या वेगवान कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी यूपी पोलिसांनी आरोपी अंकित चौधरीला गुरुवारी अटक केली.




हेही वाचा- “फाशी द्या किंवा गोळ्या घाला”, उज्जैन बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या वडिलांची मागणी
नेमकं प्रकरण काय?
पीडित महिलेच्या पतीनं पोलिसांना सांगितलं की, घटनेच्या दिवशी आरोपी अंकित याच्या दुचाकीवरून जात होता. यावेळी रस्त्याच्या बाजुला शेतात काम करणाऱ्या माझ्या पत्नीच्या आणि अन्य एका महिलेसमोर दुचाकी थांबवली आणि लघुशंका केली. यावेळी त्याने दोघींना गुप्तांग दाखवत अश्लील हावभाव केले. यावेळी महिलांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण चौधरीने माझ्या पत्नीला ढकललं आणि ती रस्त्यावर पडली. याचवेळी पाठीमागून आलेल्या कारने तिला धडक दिली.
हेही वाचा- अविवाहित बहीण गर्भवती राहिल्याने राग अनावर, आईसह भावाने दिली भयंकर शिक्षा; जंगलात नेलं अन्…
मृत महिलेच्या पतीच्या तक्रारीच्या आधारे, मंगळवारी आरोपी अंकित चौधरीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी चौधरी हा मुरादनगर येथील रहिवासी आहे, त्याने २०२० मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलातून (CRPF) स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे, अशी माहिती डीसीपी विवेक चंद यादव यांनी दिली. महिलेला धडक देणाऱ्या कार चालकाचीही ओळख पटली असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असंही ते म्हणाले.