श्रद्धा वालकर खूनप्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याने तिहार तुरुंग प्रशासनाकडे एक मागणी केली आहे. ज्यावर तिहार प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आल्याचे समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आफताबाने तुरुंगात वाचणासाठी कांदबरी आणि साहित्याची पुस्तके देण्यााची मागणी प्रशासनास केली आहे. यावर तुरुंग प्रशासनाकडून लवकरच त्याला पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. अशी माहिती तिहार तुरुंगातील सुत्रांच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.

वसईतील २६ वर्षीय श्रद्धा वालकर या तरुणीच्या खूनाने देश हादरला आहे. तिचा प्रिय आफताब अमिन पूनावाला याने श्रद्धाचा गळा आवळून केला होता. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून ते मेहरोलीतील जंगलात फेकून दिले होते. तब्बल सहा महिन्यानंतर ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता श्रद्धा वालकर खून प्रकरणात नव नवीन माहिती समोर येत आहे.

हेही वाचा – हिंदूंच्या विवाहाबाबत वादग्रस्त वक्तव्यावर खासदार बद्रुद्दीन अजमल यांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

श्रद्धाच्या वडिलांनी पोलिसांत केलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण उघड झालं होतं. त्यानंतर दिल्लीतील पोलिसांनी आफताबला अटक करत चौकशी सुरु केली आहे. सध्या आफताबची नार्को आणि पॉलिग्राफ चाचणी करण्यात येत आहे. नार्को चाचणीत आफताबने धक्कादायक खुलासे केले आहेत.

हेही वाचा – “युती तोडून महाविकास आघाडीसोबत जाऊन त्यांनी जो आमच्या कपाळावर …”; संजय राऊतांना अब्दुल सत्तारांचं प्रत्युत्तर!

आफताब अमीन पूनावाला याच्या-नार्को चाचणीनंतरचे विश्लेषण सत्र शुक्रवारी दोन तासांत पूर्ण झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे (एफएसएल) चार सदस्यीय पथक आणि तपास अधिकारी नवी दिल्लीतील तिहार कारागृहात आफताबच्या नार्को चाचणीनंतरची चौकशीसाठी आले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shraddha murder case accused aftab has asked the tihar administration to provide novels and literature books to read msr
First published on: 03-12-2022 at 18:47 IST