नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी आरोपी आफताब अमीन पूनावालाच्या नार्को चाचणीस येथील न्यायालयाने मंगळवारी दिल्ली पोलिसांना परवानगी दिली. आफताबचे वकील अविनाशकुमार यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले, की १ आणि ५ डिसेंबर रोजी रोहिणी परिसरातील न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून आफताबवर ही चाचणी करण्यासाठी पोलिसांनी परवानगी मागितली होती.

या प्रयोगशाळेच्या तज्ज्ञांच्या पथकाद्वारे रोहिणी येथील बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नार्को विश्लेषण केले जाईल. रोहिणी येथे या प्रयोगशाळेत सोमवारी पूनावाला पोलिसांच्या वाहनात असताना काही शस्त्रधारी व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला होता. समाजमाध्यमांवर पसरलेल्या हल्ल्याच्या चित्रफितीत एक पोलीस हल्लेखोरांना माघारी जाण्याचा इशारा देताना पिस्तूल दाखवताना दिसत आहे. आफताबवर या प्रयोगशाळेत मंगळवारी ‘पॉलीग्राफ’ चाचणीचे सत्र सुरू असताना बाहेरील सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली होती.

nagpur court marathi news, nagpur petitioner donate 25 thousand
दे दान सुटे गिऱ्हाण! कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावली अनोखी शिक्षा; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी
Rosary School Director s Arrest Court Extends Vinay Arhana s Custody in Loan Misappropriation Case
रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हानाच्या पोलीस कोठडीत चार दिवसांनी वाढ

नार्को विश्लेषण, ज्याला ‘ट्रुथ सीरम’ असेही म्हटले जाते, त्यात एखाद्या औषधाची (सोडियम पेंटोथल, स्कोपोलामाइन आणि सोडियम अमायटल) ठरावीक मात्रा शिरेवाटे दिली जाते. त्यामुळे संबंधित व्यक्ती गुंगीच्या विविध स्तरांवर जातो. या अवस्थेत, व्यक्ती शुद्धीत असताना जी माहिती देण्याची शक्यता कमी असते, ती माहिती त्या व्यक्तीकडून दिली जाते. त्यातून गुन्ह्यासंबंधीची काही महत्त्वाची माहिती व धागेदोरे उकलल्याने तपासास मदत होते. एखाद्या प्रकरणात पुरेसे पुरावे न मिळाल्याने गुन्ह्याची नेमकी उकल होत नसल्यास व चित्र स्पष्ट होत नसल्यास तपास यंत्रणा ही चाचणी करतात.