राजधानी दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची सध्या देशभर चर्चा सुरू आहे. श्रद्धाची तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावालानं निर्घृण हत्या केली. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून यामध्ये रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. त्यात श्रद्धाचा प्रियकर आफताब पूनावालाची आता नार्को टेस्टदेखील होणार असल्यामुळे या प्रकरणाबाबत अजून नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. त्यात आता श्रद्धा वालकरचं एक पत्र समोर आलं असून त्यामध्ये श्रद्धानं केलेल्या उल्लेखाची सध्या चर्चा सुरू झाली आहे. या पत्रासंदर्भात माध्यमांशी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे.

श्रद्धाच्या पत्रात नेमकं काय?

श्रद्धानं दोन वर्षांपूर्वी अर्थात २०२० साली नालासोपाऱ्यातील तुळींज पोलीस ठाण्यात आफताबविरोधात तक्रार दाखल केली होती. तिने पोलिसांना लिहिलेल्या पत्रामध्ये आफताब तिला जीवे मारू शकतो, अशी शक्यता नमूद केली होती. “आफताबनं मला अनेकदा मारहाण केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तो मला मारहाण करत आहे. आज त्याने मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मला भीती वाटतेय की तो मला जीवे मारून माझे तुकडे करेल आणि फेकून देईल. मला जर काही झालं, तर त्यासाठी आफताब कारणीभूत असेल”, असं श्रद्धानं त्या पत्रामध्ये नमूद केलं आहे.

Chunky Panday on daughter Ananya Panday relationship with Aditya Roy Kapur
“ती माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावते, त्यामुळे…”, चंकी पांडेचं अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूरच्या नात्याबद्दल विधान
bachchu kadu devendra fadnavis (२)
फडणवीसांनी तुम्हाला महायुतीतून बाहेर काढलंय? बच्चू कडू म्हणाले, “अमरावतीच्या सभेत त्यांनी…”
jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
Shraddha Walkar letter to police

Shraddha Murder Case: हा खरंच आफताब आहे? श्रद्धाच्या मारेकऱ्याचा FSL ऑफिसमधून बाहेर पडतानाचा व्हिडिओ व्हायरल!

फडणवीसांचं मोठं विधान

दरम्यान, श्रद्धाच्या या पत्रावर देवेंद्र फडणवीसांनी मोठं विधान केलं आहे. “ते पत्र माझ्याकडेही आलं आहे. मी ते पाहिलं आहे. ते फार गंभीर पत्र आहे. त्याच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, याचा तपास आपल्याला करावा लागणार आहे. मी कुणावरही आरोप करणार नाही. पण या प्रकारच्या पत्रांवर कारवाई नाही झाली, तर अशा घटना घडतात. त्यामुळे या पत्राचा नक्कीच तपास केला जाईल. जर त्या पत्रावर कारवाई झाली असती, तर कदाचित श्रद्धाचा जीव वाचला असता”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

आफताबची नार्को टेस्ट

दरम्यान, आफताब पूनावालाची नार्को टेस्ट करण्यासाठी न्यायालयाने परवानही दिली आहे. त्यानुसार आफताबची पॉलिग्राफी टेस्ट मंगळवारी झाली असून लवकरच त्याची नार्को टेस्ट करण्यात येणार आहे.