श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर येत असतानाच आता मुख्य आरोपी असलेल्या आफताब पूनावालासंदर्भात नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने श्रद्धाची अंगठी दुसऱ्या मुलीला भेट म्हणून दिली होती अशी माहिती समोर आली आहे. श्रद्धाची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवलेले असतानाच आफताबने दुसऱ्या एका मुलीला घरी आणल्याची माहिती यापूर्वीच्या तपासात समोर आली होती. श्रद्धाच्या वडिलांनी तिला ही अंगठी दिली होती. या प्रकरणामध्ये श्रद्धाचे वडील आणि आफताबने ज्या मुलीला ही अंगठी दिली त्या दोघांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. या दोघांनीही या अंगठीसंदर्भात दिलेली माहिती जुळत असल्याचं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने सुत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.

पोलिसांना मेहरौलीच्या जंगलामध्ये केसांचे काही बुचके सापडले असून ते फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. श्रद्धाचे वडील आणि भावाच्या डीएनएशी या केसांमधील डीएनए जुळवून पाहिला जाणार आहे. आफताबने श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्या डोक्यावरील केस कापले होते आणि त्यांची विल्हेवाट दिल्ली तसेच गुरुग्रामजवळच्या परिसरामध्ये लावली होती.

mallikarun kharge on bjp
“अनेक मंदिरांमध्ये आजही दलितांना प्रवेशबंदी”; भाजपावर आरोप करताना मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितला अनुभव
Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
Nigerian citizen, Arrested in Nalasopara, Drugs Worth 57 Lakhs, cocaine, mephedrone, drugs in nalasopara, crime in nalasopara, marathi news, crime news,
नालासोपार्‍यात ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त
controversy over bjp candidate from north mumbai piyush goyal statement on rehabilitation of slum on salt pan lands
झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनावरून वादंग; गरीब हटाव हेच भाजपचे धोरण -विरोधकांची टीका, त्याच ठिकाणी घर देण्यासाठी कटिबद्ध -गोयल यांचे प्रत्युत्तर

नक्की पाहा हे फोटो>> “आफताबने मला इतकं मारलंय की…”; ऑफिस मॅनेजरबरोबरचे श्रद्धाचे WhatsApp Chat सापडले! धक्कादायक Insta चॅटही आलं समोर

त्याचप्रमाणे पोलिसांना आणखीन एक हत्यार सापडलं असून या हत्याचाराचा वापर करुन शरीराचे तुकडे करण्यात आल्याचं सांगितलं गेलं. आफताबच्या खोलीमधील तपासामध्ये पोलिसांना पाच चाकू सापडले आहेत. “गुरुग्राम आणि दिल्लीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जंगलामध्ये आणखीन काही चाकू आणि हत्यारं सापडली आहेत. ही हत्यारं फॉरेन्सिक लॅबमध्ये (एफसीएल) पाठवण्यात आली आहेत,” असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

आफताबलच्या तपासादरम्यान त्याचं गुजरात कनेक्शनही समोर आलं आहे. आफताबला अंमली पदार्थ पुरवणाऱ्या ड्रग्स पेडलरला गुजरातमधील सुरत येथून दिल्ली पोलिसांनी अटक केल्याची माहितीही सुत्रांनी दिली. या व्यक्तीचं नाव फैजल मोहमिन असं असून तो आफताबचा मित्र आहे. आफताबला त्याच्या वसईच्या घरीही फैजल ड्रग्ज पुरवायचा अशी शंका पोलिसांना आहे. आफताबने श्रद्धाची हत्या केल्यानंतर अंमली पदार्थांचं सेवन केल्याची कबुली दिली होती.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: आफताब सिरीयल किलर? ड्रग्जच्या व्यवसायातही सहभाग? त्याच्या ओळखीतील मुलींचा शोध सुरु

आफताबच्या पॉलिग्राफ चाचणीनंतर पोलिसांनी आता नार्को चाचणीसाठी प्रश्नांची यादी तयार केली आहे. यामध्ये प्रामुख्याने हत्यारं, शरीराचे तुकडे कुठे फेकले यासंदर्भातील प्रश्न विचारले जाणार आहेत. आफताबने पॉलीग्राफ चाचणीदरम्यान ताप येत असल्याची तक्रार केली होती. मात्र तिहार तुरुंग प्रशासनातील डॉक्टरांनी आफताबची प्रकृती ठणठणीत असल्याचं सांगितलं. “तुरुंगामधील दोन कैद्यांशी बोलताना आफताब न खोकता किंवा शिंकता बोलत होता,” असं तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितलं.

आफताबच्या मालकीच्या डिजीटल गॅजेट्सच्या चाचणीमध्ये फोन, कॅमेरा आणि लॅपटॉपमधून त्याने काही मजकूर डिलीट केल्याची माहिती समोर आली आहे. हा डिलीट केलेला डेटा परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे अधकाऱ्यांनी सांगितलं.