वसईतील २६ वर्षीय श्रद्धा वालकर या तरुणीच्या खूनाने देश हादरला आहे. तिचा प्रिय आफताब अमिन पूनावाला याने श्रद्धाचा गळा आवळून केला होता. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून ते मेहरोलीतील जंगलात फेकून दिले होते. तब्बल सहा महिन्यानंतर ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता श्रद्धा वालकर खून प्रकरणात नव नवीन माहिती समोर येत आहे.

श्रद्धाच्या वडिलांनी पोलिसांत केलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण उघड झालं होतं. त्यानंतर दिल्लीतील पोलिसांनी आफताबला अटक करत चौकशी सुरु केली आहे. सध्या आफताबची नार्को आणि पॉलिग्राफ चाचणी करण्यात येत आहे. नार्को चाचणीत आफताबने धक्कादायक खुलासे केले आहेत.

nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

हेही वाचा : छत्तीसगडमध्ये आता ७६ टक्के आरक्षण, विधानसभेत दोन विधेयकं एकमतानं मंजुर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करण्यासाठी चायनीज चॉपरचा वापर केला होता. त्याप्रमाणे हातोडा, खिळे आणि करवत वापरल्याचाही खुलासा आफताबने केला आहे. यापूर्वी पोलिसांनी एक करवत आणि आणि चाकू पोलिसांनी आफताबच्या फ्लॅटवरून जप्त केलं आहे.

हेही वाचा : “फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव

नार्को आणि पॉलिग्राफ चाचणीतील आफताबने दिलेली उत्तर एकसारखीच आहेत. पण, पॉलिग्राफ चाचणीवेळी आफताबला उत्तरातील विरोधीभासाबद्दल विचारले असता त्याने सांगितलं की, सहा महिन्यांपूर्वी श्रद्धाची हत्या केली होती. त्यामुळे काही गोष्टी आठवत नाहीत. तसेच, श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ज्या ठिकाणी फेकल्याचा दावा आफताबने केला होता, त्या ठिकाणांबाबात नार्को आणि पॉलिग्राफ चाचणीत एकच उत्तर मिळालं आहे. श्रद्धाचा मोबाईल फोन मिरा-भाईंदरच्या खाडीत फेकल्याचंही आफताबने म्हटलं आहे.