पीटीआय, नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांना अद्याप जनुकीय (डीएनए) चाचणीचा अहवाल प्राप्त झालेला नाही, अशी माहिती एका अधिकाऱ्याने शनिवारी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाचे वडील आणि भाऊ यांच्या रक्ताचे नमुने डीएनए चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. मेहरौली येथून हस्तगत करण्यात आलेल्या मृतदेहाच्या अवशेषांची या रक्ताच्या नमुन्यांशी तुलना केली जाणार आहे.

  दरम्यान, श्रद्धाचा खून केल्याचा आरोप असलेला आफताब अमिन पूनावाला याला शनिवारी दिल्लीतील न्यायालयाने १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. परिमंडळ दोनचे विशेष पोलीस आयुक्त (कायदा-सुव्यवस्था) सागर प्रीत हूडा यांनी सांगितले की, याप्रकरणी पोलिसांना अद्याप डीएनए चाचणीचा अहवाल मिळालेला नाही. पॉलीग्राफ चाचणीच्या पुढील प्रक्रियेसाठी आरोपीला नेता यावे यासाठीची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

nagpur court marathi news, nagpur petitioner donate 25 thousand
दे दान सुटे गिऱ्हाण! कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावली अनोखी शिक्षा; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
Important decision of the supreme court
उमेदवारांनी संपत्ती म्हणून घड्याळही जाहीर करावं का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल; मालमत्ता प्रकरणी दिला महत्त्वपूर्ण निकाल
chandrachud (1)
“लैंगिक भेदभाव संपवा, स्त्रियाही खोल समुद्रात जाऊ शकतात”, कोस्ट गार्डप्रकरणी सुप्रिम कोर्टाने केंद्राला फटकारले
dhule police corruption marathi news
दोन लाख रुपये देत असेल तर हद्दपारी रद्द…धुळ्यात पोलिसांची गुन्हेगाराकडेच पैशांची मागणी

पॉलीग्राफनंतर नार्को चाचणीवर निर्णय

 रोहिनी येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत शुक्रवारी आफताबची पॉलीग्राफ चाचणी सुमारे तीन तास चालली. या चाचणीचे तिन्ही टप्पे पूर्ण झाले आहेत. या चाचणीचे निष्कर्ष पाहून नार्को चाचणीबाबत निर्णय घेतला जाईल, असे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवले असले तरी ही चाचणी करता येते, असे त्याने स्पष्ट केले.