पीटीआय, नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांना अद्याप जनुकीय (डीएनए) चाचणीचा अहवाल प्राप्त झालेला नाही, अशी माहिती एका अधिकाऱ्याने शनिवारी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाचे वडील आणि भाऊ यांच्या रक्ताचे नमुने डीएनए चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. मेहरौली येथून हस्तगत करण्यात आलेल्या मृतदेहाच्या अवशेषांची या रक्ताच्या नमुन्यांशी तुलना केली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

  दरम्यान, श्रद्धाचा खून केल्याचा आरोप असलेला आफताब अमिन पूनावाला याला शनिवारी दिल्लीतील न्यायालयाने १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. परिमंडळ दोनचे विशेष पोलीस आयुक्त (कायदा-सुव्यवस्था) सागर प्रीत हूडा यांनी सांगितले की, याप्रकरणी पोलिसांना अद्याप डीएनए चाचणीचा अहवाल मिळालेला नाही. पॉलीग्राफ चाचणीच्या पुढील प्रक्रियेसाठी आरोपीला नेता यावे यासाठीची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shraddha walker murder case police await dna test report desh videsh ysh
First published on: 27-11-2022 at 00:02 IST