Moose Wala Murder: "मला जिवंत पकडणं तुम्हाला शक्य नाही," मास्टरमाइंड गोल्डी ब्रारचं थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान, व्हिडीओ व्हायरल | Siddhu Moosewala Murder Mastermind Goldy Brar claims he is detained in US sgy 87 | Loksatta

Moose Wala Murder: “मला जिवंत पकडणं तुम्हाला शक्य नाही,” मास्टरमाइंड गोल्डी ब्रारचं थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान, व्हिडीओ व्हायरल

अटक होण्याआधी स्वत:ला ठार करणार, गोल्डी ब्रारचा दावा

Moose Wala Murder: “मला जिवंत पकडणं तुम्हाला शक्य नाही,” मास्टरमाइंड गोल्डी ब्रारचं थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान, व्हिडीओ व्हायरल
अटक होण्याआधी स्वत:ला ठार करणार, गोल्डी ब्रारचा दावा

पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड गोल्डी ब्रार याला कॅलिफोर्नियात अटक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिली आहे. मात्र आता गोल्डी ब्रार याचा एक कथित व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यामध्ये त्याने आपण अमेरिकेत नसून, अटकही झाली नसल्याचा दावा केला आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी २ डिसेंबरला गोल्डी ब्रार याला कॅनिफोर्निया पोलिसांनी ताब्यात घेतलं असून लवकरच भारतात आणलं जाईल अशी माहिती दिली होती. लवकरच तो पंजाब पोलिसांच्या ताब्यात असेल असा दावा त्यांनी केला होता.

“मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रालय किंवा परराष्ट्र मंत्रालयाची वाट न पाहताच जाहीर करुन टाकलं आहे. आपण मूसेवालाच्या हल्लेखोराला पकडलं आहे सांगत त्यांना मतदारांवर छाप पाडायची आहे,” अशी टीका विरोधी पक्षनेते प्रताप सिंग बाजवा यांनी केली आहे.

विश्लेषण : कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रारला अमेरिकेत अटक, सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाशी काय आहे संबंध?

दरम्यान गोल्डी ब्रारने युट्यूबवर सतिंदरजीत सिंग या पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत आपल्याला अटक केल्याचा दावा खोडून काढला आहे. मात्र या मुलाखतीत किती तथ्य आहे याची पडताळणी झालेली नाही.

व्हिडीओतील व्यक्ती आपण गोल्डी ब्रार असल्याचं सांगत आहे. तसंच आपण अमेरिकेत नसून, अटकेची कारवाई झाली नसल्याचंही सांगत आहे. मुलाखतीतील ऑडिओ क्लिपलमध्ये संबंधित व्यक्ती भगवंत मान यांचे दावे फेटाळून लावत आहे.

गोल्डी ब्रारचं खरं नाव सतिंगरजित सिंग असून आपण फार दिवसांपूर्वी कॅनडा आणि अमेरिका सोडली असून सध्या युरोपमध्ये असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्याने आपल्याला कधीच जिवंत पकडू शकणार नाही असं आव्हानही दिलं आहे. तसंच जर आपण कधी अटक होण्याची स्थिती निर्माण झाली, तर सोबत एक शस्त्र ठेवलं असून त्याच्याने गोळी घालून स्वत:ला ठार करु असं त्याने म्हटलं आहे.

सिद्धू मूसेवाला याची पंजाबमधील मनसा जिल्ह्यात २९ मे रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. लॉरेन्स बिष्णोई गँगचा सदस्य असणाऱ्या गोल्डी ब्रारने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. यानंतर त्याच्याविरोध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 16:19 IST
Next Story
विवेक अग्निहोत्रीने मागितली विनाअट माफी, मात्र, दिल्ली उच्च न्यायालय म्हणाले, “एवढं पुरेसं नाही, तर…”