पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर एकच खळबळ उडाली होती. पंजाब सरकारने सिद्धू मुसेवालाची सुरक्षा काढून घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर आरोपींचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात सिद्धू मुसेवालाची हत्या केल्यानंतर आरोपीं कारमध्ये बसून जल्लोष करताना दिसत आहेत.

सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर आरोपी कारमध्ये बसून पिस्तूल फिरवताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. व्हिडिओत कार चालणाऱ्या आरोपीचे नाव कपिल पंडित आहे. तर त्याच्या शेजारी बसलेल्या आरोपीचे नाव प्रियव्रत फौजी आहे. कारमध्ये मागच्या बाजूला डावीकडे बसलेल्या आरोपीचे नाव सचिन भिवानी आहे. मध्यभागी बसलेला आरोपी अंकित सिरसा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंकितनेच सिद्धू मुसेवालवर गोळी चालवली होती. अंकितला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे.

द्धू मुसेवालांच्या हत्येसाठी एकूण आठ जणांना सुपारी
व्हिडिओमध्ये अंकित दोन्ही हातात पिस्तूल घेऊन फिरवताना दिसत आहे. पोलिसांनी अंकितसोबत सचिन भिवानीलाही अटक केली आहे. सिद्धू मुसेवालांच्या हत्येसाठी एकूण आठ जणांना सुपारी देण्यात आलेली. यापैकी तिघे पंजाबमधील होते. तर अन्य पाच जणांना महाराष्ट्र आणि राजस्थानमधून बोलवण्यात आलेलं. सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव हे पुण्याचे असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे