सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर ओरोपींनी हवेत पिस्तूल फिरवत केला जल्लोष, पाहा व्हिडिओ

पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात २९ मे २०२२ रोजी सायंकाळी जवाहरके गावात सिद्धू मुसेवालाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

sidhu_moosewala
सिद्धू मूसेवाला

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर एकच खळबळ उडाली होती. पंजाब सरकारने सिद्धू मुसेवालाची सुरक्षा काढून घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर आरोपींचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात सिद्धू मुसेवालाची हत्या केल्यानंतर आरोपीं कारमध्ये बसून जल्लोष करताना दिसत आहेत.

सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर आरोपी कारमध्ये बसून पिस्तूल फिरवताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. व्हिडिओत कार चालणाऱ्या आरोपीचे नाव कपिल पंडित आहे. तर त्याच्या शेजारी बसलेल्या आरोपीचे नाव प्रियव्रत फौजी आहे. कारमध्ये मागच्या बाजूला डावीकडे बसलेल्या आरोपीचे नाव सचिन भिवानी आहे. मध्यभागी बसलेला आरोपी अंकित सिरसा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंकितनेच सिद्धू मुसेवालवर गोळी चालवली होती. अंकितला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे.

द्धू मुसेवालांच्या हत्येसाठी एकूण आठ जणांना सुपारी
व्हिडिओमध्ये अंकित दोन्ही हातात पिस्तूल घेऊन फिरवताना दिसत आहे. पोलिसांनी अंकितसोबत सचिन भिवानीलाही अटक केली आहे. सिद्धू मुसेवालांच्या हत्येसाठी एकूण आठ जणांना सुपारी देण्यात आलेली. यापैकी तिघे पंजाबमधील होते. तर अन्य पाच जणांना महाराष्ट्र आणि राजस्थानमधून बोलवण्यात आलेलं. सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव हे पुण्याचे असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sidhu musa wala murder accused clebrite in car turned the gun in the air video viral dpj

Next Story
TRS चं मोदींसाठी गुजरातीतून १५ मुद्द्यांचं ट्वीट, भाजपाचं उर्दूमध्ये प्रत्युत्तर
फोटो गॅलरी