सिक्कीम : भारतीय लष्कराचे वाहन दरीत कोसळले; तीन जवानांसह एका मुलाचा मृत्यू

अपघातात गंभीर जखमी झालेल्या अन्य एका जवानावर उपचार सुरू

सिक्कीममध्ये भारत-चीन सीमेजवळ लष्करी अधिकाऱ्याच्या १३ वर्षीय मुलासह तीन भारतीय जवानांचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली. रविवार (२० डिसेंबर) रोजी येथील नाथुलाजवळ १७ व्या मैलावर लष्कराचे एक वाहन जवाहरलाल नेहरू मार्गावरून खाली घसरून दरीत कोसळल्याने हा अपघात घडला.

पूर्व सिक्कीमचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) एसई येलसरी यांनी याबाबत माहिती दिली. या अपघतात गंभीर जखमी झालेल्या आणखी एका जवानावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, तीन जवान व लष्करी अधिकाऱ्याच्या मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.

बर्फाच्छादित रस्ते असल्याने गाडी मार्गावरून घसरल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवल्या गेला आहे. तर, गाडी दरीत कोसळल्यानंतर गाडीचा अक्षरश: चुराडा झाल्याचे दिसून आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sikkim three indian army soldiers along with a 13 year old child of a colonel lost their lives msr