‘मोदी पंतप्रधान झालेले देशातील लोकांना बघायचे आहे’

देशातील लोकांना गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान झालेले बघायचे आहे. त्यामुळे लालकृष्ण अडवानी यांनीही आता मोदींना आशीर्वाद द्यावेत, अशी अपेक्षा विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख अशोक सिंघल यांनी व्यक्त केली.

देशातील लोकांना गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान झालेले बघायचे आहे. त्यामुळे लालकृष्ण अडवानी यांनीही आता मोदींना आशीर्वाद द्यावेत, अशी अपेक्षा विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख अशोक सिंघल यांनी व्यक्त केली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोदींची प्रचारप्रमुखपदी निवड झाल्याचे सिंघल यांनी स्वागत केले.
ऋषिकेश येथे वानप्रस्थ आश्रमात सिंघल पत्रकारांशी बोलत होते. मोदी यांची प्रचारप्रमुखपदी निवड करून भाजपने देशातील लोकभावनेचा मान राखला आहे, असे सांगून सिंघल म्हणाले, यूपीए हे केवळ घोटाळ्यांचे सरकार आहे. आपले शत्रूराष्ट्र स्वतःची ताकद सीमेवर वाढवत असताना केंद्र सरकार केवळ बघ्याची भूमिका घेते. देशाची सत्ता खंबीर नेतृत्त्वाकडे सोपविण्याची लोकांची इच्छा आहे.
दरम्यान, बाबा रामदेव यांनीही मोदी यांच्या निवडीचे स्वागत केले. योग्य दिशेने टाकलेले पहिले पाऊल या शब्दांत त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Singhal hails modis appointment as bjp campaign panel chief