scorecardresearch

Premium

“आमचे आंदोलन कमजोर करू नका…”, विनेश फोगाट यांची बबिता फोगाट यांना हात जोडून विनंती; म्हणाल्या…

विनेश फोगाट यांची बहिण बबिता फोगाट यांनी या आंदोलनाबाबत ट्वीट केलं होतं. या ट्वीटला प्रत्युत्तर देताना विनेश फोगाट यांनी बबिता फोगाट यांना कळकळीची विनंती केली आहे.

sister-i-request-you-dont-weaken-our-movement-vinesh-phogat-to-babita-phogat-sgk-96
विनेश फोगाट काय म्हणाल्या? (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीगिरांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. याप्रकरणी खेळाडूंकडून जंतरमंतरवर आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला आता विविध स्तरातून पाठिंबा मिळत असताना अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे. पी. टी उषा यांनीही साक्षी मलिक, विनेश फोगाटसह रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर टीका केली होती. आता विनेश फोगाट यांची बहिण बबिता फोगाट यांनी या आंदोलनाबाबत ट्वीट केलं होतं. या ट्वीटला प्रत्युत्तर देताना विनेश फोगाट यांनी बबिता फोगाट यांना कळकळीची विनंती केली आहे.

बबिता फोगाट यांचं ट्वीट काय?

बबिता फोगाट भाजपाच्या तिकिटावरून हरियाणा विधानसभा निवडणुकीत उभ्या राहिल्या होत्या. मात्र, त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. बबिता फोगाट यांनी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक ट्वीट केले होते. “महिला कुस्तीपटूंना न्याय मिळावा यासाठी प्रियंका वड्रा त्यांचे स्वीय सचिव संदीप सिंग यांच्यासोबत जंतरमंतरवर पोहोचले आहेत. पंरतु, या व्यक्तीने स्वतः महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे, तसंच त्यांनी दलित महिलांविरोधातही वक्तव्य केलं होतं,” असं ट्वीट केलं होतं.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
बबिता फोगाट यांचं ट्वीट

बबिता फोगाट यांचं ट्वीट आल्यानंतर त्यावर अनेकांनी विरोधात प्रतिट्वीट केले आहेत. तर, विनेश फोगाट यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. “जर पीडित महिला कुस्तीपटूंच्या हक्कासाठी उभे राहता येत नसेल तर बबिता तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आमच्या आंदोलनाला कमजोर करू नका”, असं ट्वीट विनेश फोगाट यांनी केलं आहे.

हेही वाचा >> “महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्यांना थेट…”, महिला कुस्तीगिरांची भेट घेतल्यानंतर अरविंद केजरीवालांची संतप्त प्रतिक्रिया

त्या पुढे म्हणाल्या की, “महिला कुस्तीपट्टूंवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवायला वर्षे लागली आहेत. तुम्हीही महिला आहात आणि आमचं दुःख समजून घेण्याचा प्रयत्न करा.”

दरम्यान, महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांची शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी दखल घेतली असून ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर ‘पोक्सो’सह आणखी एका कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या खेळाडूंनी समाधान व्यक्त केलं आहे. मात्र, ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sister i request you dont weaken our movement vinesh phogat to babita phogat sgk

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×