प्रियकराबद्दल आई-वडिलांना सांगितले म्हणून बहिणीने चार वर्षाच्या भावाची केली हत्या

सख्ख्या भावाची हत्या केल्या प्रकरणी लुधियाना पोलिसांनी रेणू कानौजिया (१९) या तरुणीला अटक केली आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

सख्ख्या भावाची हत्या केल्या प्रकरणी लुधियाना पोलिसांनी रेणू कानौजिया (१९) या तरुणीला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी एका गोणीमध्ये अंश कानौजियाचा मृतदेह सापडला होता. अंश अवघ्या चार वर्षांचा होता. रेणूचे बाहेर प्रेम प्रकरण सुरु होते. अंशने काही दिवसांपूर्वी आई-वडिलांना रेणूच्या प्रियकराबद्दल सांगितल्याने रेणू त्याच्यावर नाराज होती.

चौकशीमध्ये तिने भावाच्या हत्येची कबुली दिली. १५ दिवसांपूर्वीच आपण भावाच्या हत्येचा कट आखल्याचे तिने सांगितले. सहा ऑक्टोंबरला आई-वडिल घरी नसताना तिने अंशची गळा आवळून हत्या केली. भावाची हत्या केली म्हणून रेणूला कुठलीही खंत नाहीय.

आपल्या प्रेमसंबंधांमध्ये भाऊ अडथळा ठरत होता असे तिने सांगितले. भाऊ प्रत्येक ठिकाणी आपल्या मागे यायचा. एकदिवस ती तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी जात असताना अंश तिच्या मागे आला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sister killed brother for telling parents about her boyfriend