युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेन्स्की यांनी पाश्चिमात्य देशांकडे लष्करी मदतीची मागणी केलीय. आम्हाला वेळीच मदत केली नाही तर रशिया युरोपमध्येही शिरकाव करेल असा इशाराही त्यांनी दिलाय. (युद्धाच्या लाइव्ह अपडेट्ससाठी येथे क्लिक करा) त्यावेळी झेलेन्स्की यांनी पुतिन यांना थेट समोरासमोर बसून चर्चा करण्याचं आवाहन केलंय. आपण समोरासमोर बसून चर्चा केली तरच युद्धावर तोडगा निघू शकतो असं झेलेन्स्की म्हणालेत.

नक्की वाचा >> Ukraine War: “मला अजिबात कल्पना नव्हती की…”; आनंद महिंद्रा लवकरच करणार मोठी घोषणा?

युद्ध थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे…
“तुम्हाला आकाशात उड्डाण करणाऱ्या विमानांवर बंदी घालता येत नसेल तर मला विमाने द्या,” असं झेलेन्स्की यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून युरोपीय देशांकडे मदतीची मागणी करताना म्हटलंय. “आम्ही राहिलो नाही तर लातविया, लुथेनिया, इस्टोनिया या देशांना लक्ष्य केलं जाईल. माझ्यावर विश्वास ठेवा,” असं झेलेन्स्की म्हणालेत. याचवेळी त्यांनी ‘हे युद्ध थांबवण्याचा मार्ग’ म्हणजे पुतिन यांनी समोर थेट बसून आपल्याशी चर्चा करावी हा असल्याचंही म्हटलंय.

President Muizzu party secures big win in Maldive
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष विजयाच्या समीप; चीनधार्जिण्या मोइझ्झू यांच्या पक्षाला ‘मजलिस’मध्ये सर्वाधिक जागा
iran attack israel
जग पुन्हा युद्धाच्या छायेत; इराण पुढच्या ४८ तासांत इस्रायलवर हल्ला करणार, भारताने नागरिकांना दिला इशारा…
Attack on NIA West Bengal
पश्चिम बंगालमध्ये ‘एनआयए’च्या पथकावर हल्ला; वाहनांची तोडफोड, दोन अधिकारी जखमी
25 prominent politicians joined BJP
आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ‘कलंकित’; भाजपमध्ये येताच ‘चकचकीत’

नक्की पाहा >> देशाचं नाव चुकीचं घेतल्यानं नारायण राणे ट्रोल; मुंबई विमानतळावरील व्हिडीओ झाला व्हायरल

काही अंतरावर समोरासमोर बसून बोलू…
“आम्ही रशियावर हल्ला केलेला नाही. आम्ही हल्ला करण्याची योजनाही बनवत नाहीय. तुम्हाला आमच्याकडून काय हवंय? आमच्या जमीनीवरील ताबा सोडा,” असं झेलेन्स्की यांनी पुतिन यांना आवाहन केल्याचं एएफपी या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तात म्हटलंय. “माझ्यासोबत बसा. आपण अगदी एकमेकांपासून ३० मीटरवर (जसे तुम्ही फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत बसला होता तसे) बसून बोलूयात,” असं झेलेन्स्कींनी म्हटलंय.

नक्की वाचा >> Ukraine War: रशियन उद्योजकाने दिली पुतिन यांची साडेसात कोटींची सुपारी; म्हणाला, “जिवंत किंवा मृत पकडून…”

पुतिन यांनी यापूर्वी अनेक बड्या नेत्यांशी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केलीय. एका लांबलचक टेबलाच्या एका बाजूला पुतिन आणि एका बाजूला पाहुणे म्हणून आलेले वेगवेगळ्या देशांचे नेते असे फोटो अनेकदा समोर आलेत. त्याचा संदर्भ झेलेन्स्की यांनी दिलाय.

काही आठवड्यापूर्वीच व्यक्त केलेली हल्ल्याची भीती
झेलेन्स्की यांनी काही आठवडेआधीच युक्रेनवर रशिया हल्ला करेल अशी भीती व्यक्त केलेली. “आजच्या आधुनिक जगामध्ये एखादी व्यक्ती अशाप्रकारे वागू शकते असं वाटलं नव्हतं,” असंही झेलेन्स्की म्हणालेत.

नक्की वाचा >> Ukraine War: “या गुलाबाच्या फुलाचं काय करु? त्यापेक्षा…”; युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्याची केंद्र सरकारवर टीका

…त्यामुळेच युक्रेनवर हल्ला केला
युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी बोलणी करण्यास रशिया तयार आहे, मात्र युक्रेनची लष्करी आधारभूत संरचना नष्ट करण्यासाठीचे आमचे प्रयत्न सुरूच राहतील, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जेई लॅवरॉव्ह यांनी म्हटले आहे. पाश्चिमात्य देशांनी कायम युक्रेनला शस्त्रपुरवठा केला आहे, त्याच्या फौजांना प्रशिक्षण दिले आहे आणि युक्रेनचे रूपांतर रशियाविरोधी तटबंदीत करण्यासाठी तेथे तळ बांधले आहेत, असा आरोप लॅवरॉव्ह यांनी केला. यामुळे आपल्या सुरक्षितलेला धोका निर्माण झाल्यामुळेच आपल्याला युक्रेनविरुद्ध कारवाई करणे भाग पडले, असे रशियाचे म्हणणे आहे.

नक्की वाचा >> Ukraine War: मोठी बातमी! पुतिन यांनी Nuclear Attack च्या भीतीने आपल्या कुटुंबियांना…

२२७ नागरिक ठार
एका आठवडय़ापूर्वी सुरू झालेल्या रशियाच्या लष्करी आक्रमणात आतापर्यंत २२७ नागरिक ठार, तर ५२५ नागरिक जखमी झाले असल्याचे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयाने म्हटले आहे. यापूर्वी २०१४ साली रशिया समर्थक फुटीरतावादी आणि युक्रेनी फौजा यांच्यात पूर्व युक्रेनमध्ये झालेल्या लढाईत १३६ जण ठार, तर ५७७ जखमी झाले होते. त्यापेक्षा ताज्या युद्धातील नागरिकांची जीवहानी जास्त आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्तांच्या कार्यालयाने सांगितले. बहुतांश मृत्यू तोफगोळय़ांचा मारा, मल्टी- लाँच अग्निबाण यंत्रणा आणि हवाई हल्ले यांसह स्फोटक शस्त्रांच्या वापरामुळे झालेले असल्याचेही या कार्यालयाचे म्हणणे आहे.