Sitrang Cyclone in Bay of Bangal: अलीकडेच अमेरिकेच्या हवामान खात्याने पूर्व भारतात ‘सुपर चक्रीवादळ’ धडकण्याची शक्यता वर्तवली होती. पण शनिवारी भारतीय हवामानशास्त्र विभागानं (IMD) हा अंदाज फेटाळून लावला. तसेच पूर्व भारतात कोणत्याही प्रकारच्या चक्रीवादळाचा धोका नसल्याचं हवामान विभागाने म्हटलं.

तथापि, मंगळवारी सकाळी कोलकाता येथील आयएमडीच्या प्रादेशिक हवामान केंद्राने बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार असल्याची माहिती दिली आहे. सोमवारी दक्षिण अंदमान समुद्र आणि त्याच्या आसपासच्या परिसरात सौम्य चक्रीवादळ निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. आज सकाळपर्यंत हे वादळ उत्तर अंदमान समुद्र परिसरात होते, अशी माहितीही कोलकता येथील प्रादेशिक हवामान केंद्राने दिली.

Heat wave in the state know where the heat wave warning is
राज्यात उष्णतेची लाट… जाणून घ्या उष्णतेच्या लाटेचा इशारा कुठे?
Maharashtras E-crop Inspection project has attracted the Central Government
महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाची केंद्राला भुरळ
MHADA Lease Renewal Linked to Ready Reckoner Rates Housing Societies Face High Renewal Costs
म्हाडा वसाहतींचा भाडेपट्टा महागच! दंडात्मक तरतुदीत सहा महिन्याची सवलत
Bhiwandi lok sabha
महाविकास आघाडीत भिवंडीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला ?

पुढील ४८ तासांत दक्षिण-पूर्व बंगाल आणि लगतच्या भागत हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. २२ ऑक्टोबरपर्यंत याचं चक्रीवादळात रुपांतर होईल. त्यानंतर हे वादळ पश्चिम-वायव्य दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात हे चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे,” अशी माहिती कोलकाता येथील IMD च्या RWFC ने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात दिली आहे. या वादळाचं नाव ‘सीतरंग’ ठेवण्यात आलं असून या वादळाची दिशा नेमकी कशी असेल? याबाबत आताच भाष्य करणं खूप घाईचं असेल, असं मत हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचा- “तुम्ही कसा काटा लावला होता? हे…” पुणे पाण्याखाली गेल्यावरून चंद्रकांत पाटलांचं अजित पवारांवर टीकास्र!

चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका किती?
सध्या महाराष्ट्राला परतीच्या पावसानं झोडपून काढलं आहे. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला आहे. ऐन दिवाळी बंगालच्या उपसागरात धडकणाऱ्या संभाव्य चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही कमी-अधिक प्रमाणात धोका आहे. ‘सीतरंग’ चक्रीवादळाचा परिणाम म्हणून २३ आणि २४ ऑक्टोबर रोजी पूर्व महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या परिसरात पावसाची शक्यता आहे.