मथुरा – यमुना द्रुतगती महामार्गावर एका कंटेनर ट्रकची बसशी टक्कर झाल्याने सहा जणांचा मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला, असे पोलिसांनी सांगितले. मथुरा जिल्ह्यातील सुरीर पोलीस स्टेशन परिसरात शुक्रवारी पहाटे २:४५ वाजता ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडाहून कानपूरला जाणारी बस महामार्गावर मध्यभागी थांबली होती. काही प्रवासी खाली उतरले होते. त्याच वेळी कंटेनर ट्रकने आधी बसला धडक दिली आणि त्यानंतर बसमधून उतरलेल्या प्रवाशांना चिरडले. या अपघातात जखमीची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला असून त्याचा शोध सुरू आहे.
