गुजरातमधील खेडा येथे नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित गरबा कार्यक्रमात झालेल्या दगडफेकीत सहाजण जखमी झाले आहेत. उंधेला गावात सोमवारी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील प्रमुखांनी हा गरबा कार्यक्रम आयोजित केला होता. येथून जवळच मंदिर आणि मशीद आहे. कार्यक्रम सुरु होण्याआधी काही लोकांनी येऊन तो बंद करण्यास सांगितलं. यानंतर केलेल्या दगडफेकीत सहाजण जखमी झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दगडफेक झाल्याची माहिती मिळताच डीएसपी राजेश गाधिया आणि क्राइम ब्रांचचं पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. पोलीस सध्या आरोपींची ओळख पटवत आहेत. त्यांच्याविरोधात कडक कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तसंच परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी गावात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

“उंधेला गावात नवरात्री साजरी होत असताना आरिफ आणि जाहीर यांनी काहीजणांसोबत मिळून गोंधळ घातला. यानंतर त्यांनी दगडफेक केली, ज्यामध्ये सहा जण जखमी झाले,” अशी माहिती डीएसपी राजेश गाधिया यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six injured after stones pelted during navratri celebrations in gujarat sgy
First published on: 04-10-2022 at 09:38 IST