केरळच्या कोल्लम येथे काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेसाठी कार्यकर्त्यांनी एका भाजीवाल्याला पैसे मागितल्याचे पुढे आले होते. यावरून भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. देश लूटणारे आता भाजीवाल्यांनीही लूटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – SCO Summit 2022: भारताला ‘मॅन्युफॅक्चरिंग हब’ बनवायचंय- पंतप्रधान नरेंद्र मोदी

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान केरळमधील कोल्लममध्ये भाजीवाल्याकडे पैशांची मागणी करण्यात आली होती. यावेळी भाजी विक्रेते एस फवाज यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ५०० रुपये दिले. मात्र, त्यांनी दोन हजार रुपयांची मागणी केली. भाजीविक्रेत्याने मनाई केली असता काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली.

दरम्यान, या प्रकारावरून भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. देश लूटणारा भाजी वाल्यांनाही लूटत असल्याचे त्यांनी ट्वीट करत म्हटले.

हेही वाचा – “महाविकास आघाडीने दीड वर्ष…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वेदान्तवरून आरोप; म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी मोठे…”

काँग्रेसने या घटनेची दखल घेत काँग्रेसच्या तीन कार्यकर्त्यांना निलंबित करण्यात आले आहे. केरळ काँग्रेसचे अध्यक्ष के सुधाकरन यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली. तसेच काँग्रेस देणगीसाठी कोणावरही जबरदस्ती करणार नसून ज्यांना स्वत:हून देणगी द्यायची ते देऊ शकता, असेही ते म्हणाले.