देशात गेल्या काही दिवसांपासून इंधन आणि गॅसचे दर सातत्याने वाढत आहेत. अशातच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना आज दिल्ली-गुवाहाटी विमानातून इंधन दरवाढीबाबत विचारणा केली असता त्यांनी उत्तरं दिली. काँग्रेसच्या महिला विंगच्या कार्यवाहक प्रमुख नेट्टा डिसोझा या स्मृती इराणीची चौकशी करत होत्या. डिसूझा यांनी यासंदर्भात व्हिडीओ ट्विट केलाय. ज्यामध्ये मंत्री त्यांच्या फोनवर हे संभाषण रेकॉर्ड करताना दिसत आहेत.

नेट्टा डिसोझा यांनी हा व्हिडीओ ट्वीट करताना स्मृती इराणींना टॅग केलंय. कॅप्शनमध्ये म्हटलंय की, “मोदीच्या मंत्री स्मृती इराणी यांची गुवाहाटीला जाताना भेट झाली. एलपीजीच्या वाढत्या किमतींबद्दल विचारले असता, त्यांनी मोफत लसी, राशन आणि गरीबांनाही दोष दिला! सामान्य लोकांच्या दुःखावर त्यांनी कशी प्रतिक्रिया दिली हे या व्हिडीओत पाहा!”.

इराणी यांनी सुरुवातीला काँग्रेस नेत्या मार्ग अडवत असल्याचं म्हटलं. तसेच स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा आणि वाढत्या किमतीबद्दल विचारलं असता ‘खोटं बोलू नका’ असे म्हणताना ऐकू येतात.