भारताने आज संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पाकिस्तानचा चांगलीच फटकार लगावली आहे. पाकिस्तान हा दहशतवाद्यांना आश्रय देणारा आणि अल्पसंख्यांकांवर अन्याय करणारा देश असल्याचं भारताने संपूर्ण जगाला सांगत पाकिस्तानचं पितळं उघडं पाडलं. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या बेताल वक्तव्यांवरुन भारताने पाकिस्तानवर एका अर्थाने शाब्दीक सर्जिकल स्ट्राइक केला.

भारताच्या या शाब्दीक सर्जिकल स्ट्राइकचं नेतृत्व करत होत्या स्नेहा दुबे, स्नेहा या संयुक्त राष्ट्राच्या आमसभेतील भारताच्या पहिल्या महिला सचिव आहेत. “जाळपोळ करणारा हा देश स्वत:ला फायर फायटर म्हणवून घेतो. पाकिस्तान आपल्या प्रदेशामध्ये दहशतवाद्यांना आश्रय देतो. असं करण्यामागे त्यांना एकच अपेक्षा असते की यामुळे त्यांच्या शेजारच्या देशाला हानी पोहचवता येईल. या लोकांच्या धोरणांमुळे आमच्या प्रदेशालाच नाही तर संपूर्ण जगाला त्रास सहन करावा लागतोय. एकीकडे असं वागताना दुसरीकडे त्यांच्या देशातील हिंसक घटना ते दहशतवादाचा आम्हाला फटका बसलाय असं म्हणत लपवू पाहत आहेत,” अशा तिखट शब्दांमध्ये भारताच्या या महिला अधिकाऱ्याने पाकिस्तानला आरसा दाखवण्याचं काम करत त्यांची दुटप्पी भूमिका जगासमोर आणली.

chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
baramati mp supriya sule talk regarding anonymous letter on social media
निनावी पत्राबाबत माहिती नाही! सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण
russian soldier
‘रशियात अडकलेल्या २० भारतीयांच्या सुटकेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न’, परराष्ट्र खात्याची माहिती
Bhandara District Jail, Female Guard, Assaulted, Detainee, crime news,
धक्कादायक! कारागृहातील बंदीवानाचा महिला रक्षकावर प्राणघातक हल्ला

स्नेहा यांच्या या भाषणाची जगभरामध्ये चर्चा आहे. सोशल नेटवर्किंगवरही स्नेहा यांचं कौतुक होताना दिसत आहे. जागतिक मंचावर जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचं प्रतिनिधित्व करताना अगदी आत्मविश्वासाने आणि संयमी शब्दांमध्ये स्नेहा यांनी पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला त्या गोष्टीचं कौतुक केलं जात आहे. अनेकांनी इतक्या कमी वयामध्ये स्नेहा यांनी केलेली कामगिरी फारच कौतुकास्पद असल्याचं म्हटलं आहे.
स्नेहा या २०१२ च्या बॅचच्या आयएफएस म्हणजेच इंडियन फॉरेन सर्व्हिसच्या अधिकारी आहेत. त्यांनी गोव्यामधून त्यांचं शिक्षण पूर्ण केलं असून उच्च शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन कॉलजेमधून पूर्ण केलं आहे. त्यानंतर दिल्लीमधील पंडित जवाहरलाल नेहरु विद्यापिठामधून म्हणजेच जेएनयूमधून त्यांनी एमफीलचं शिक्षण घेतलं आहे.

वयाच्या १२ व्या वर्षांपासूनच स्नेहा यांनी इंडियन फॉरेन सर्व्हिसेसमध्ये काम करायचा निश्चय मनाशी बाळगला होता. त्यांनी यासाठी आवश्यक असणारी केंद्रीय आयोगामार्फत घेण्यात स्पर्धा परिक्षा दिली आणि त्या पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्या. २०११ मध्ये त्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या.

जागतिक घडामोडींबद्दल जाणून घेण्याची इच्छा, नवीन संस्कृतींबद्दल जाणून घेण्याची आवड, देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी, देशासाठी धोरण ठरवण्यासाठी देता येणारं योगदान आणि लोकांची मदत करण्यासाठी मिळणारी संधी यासारख्या गोष्टींमुळेच आपण या क्षेत्रात आल्याचं स्नेहा सांगतात.

भटकंतीची प्रचंड आवड असणाऱ्या स्नेहा यांनी आयएफएस अधिकारी होऊन आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्याची सर्वोत्तम संधी आपल्याला मिळाल्याचं स्नेहा सांगतात. सरकारी सेवेमध्ये रुजू झालेल्या स्नेहा या त्यांच्या कुटुंबातील पहिल्याच सदस्या आहेत. त्यांचे वडील एका खासगी बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करतात तर आई शिक्षिका आहे.

परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर २०१२ साली त्यांची पहिली पोस्टींग परराष्ट्र मंत्रालयामध्ये झाली होती. त्यानंतर ऑगस्ट २०१४ रोजी त्यांना माद्रीदमधील भारतीय दुतावासामध्ये नियुक्त करण्यात आलं. सध्या त्या संयुक्त राष्ट्रामध्ये भारताच्या पहिल्या महिला सचिव म्हणून कार्यरत आहेत.