Snow ejaculation Kedarnath temple area Uttarakhand devotees Panic ysh 95 | Loksatta

केदारनाथ मंदिर परिसरात हिमस्खलन 

उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिर परिसरात शनिवारी सकाळी हिमस्खलन झाल्याने  भाविकांत घबराट पसरली होती.

केदारनाथ मंदिर परिसरात हिमस्खलन 
सौजन्य- एएनआय

पीटीआय, डेहराडून : उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिर परिसरात शनिवारी सकाळी हिमस्खलन झाल्याने  भाविकांत घबराट पसरली होती. मात्र, चिंता करण्याचे कारण नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी सांगितले, की सकाळी साडेसहाला ‘केदार डोम’ आणि ‘स्वर्गरोहिणी’ दरम्यान एक हिमनग तुटून केदारनाथ मंदिराच्या मागे असलेल्या चोराबाडमी तलावात कोसळला. तीन-चार मिनिटे तलावाच्या पाण्यावर बर्फाचे ढिगारे तरंगले. मंदिराच्या मागे हिमस्खलन झाल्याने भक्तांमध्ये भीती पसरली. या घटनेने २०१३ च्या केदारनाथ पुराच्या विध्वंसकारी पुराची आठवण झाली. मात्र, या हिमनगांमुळे मंदाकिनी आणि सरस्वती नद्यांची पातळी वाढली नाही. त्यामुळे घाबरण्याची गरज नसल्याचे अजय यांनी सांगितले. प्रशासन, मंदिर समिती, गढवाल मंडल विकास महामंडळ आणि राज्य आपत्ती निवारण कक्षाचे पथक सतत पाणीपातळीवर लक्ष ठेवून आहेत. मंदिरापासून खूप दूर ही घटना घडली आहे.  केदारपुरी वस्तीवर त्याचा  परिणाम झालेला नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अमेरिकेत वादळामुळे ३० जणांचा मृत्यू; इयानमुळे फ्लोरिडा, कॅरोलिनात विध्वंस; मृतांची संख्या वाढण्याची भीती

संबंधित बातम्या

Hijab Ban: इराणमधल्या महिलांच्या हिजाब सक्तीविरोधातील संघर्षाला यश; ‘संस्कृतीरक्षक पोलिसां’चा गाशा गुंडाळला
“जाहिरातीत सांगितल्यापेक्षा गाडी कमी मायलेज देते”, ग्राहकाची कोर्टात याचिका, निकाल देताना कोर्टानं संगितलं…!
राजस्थान काँग्रेसमध्ये एकजूट, पक्षांतर्गत वाद निव्वळ कथा ;पायलट
“मला माफ करा, मी हा शब्द…”, देवेंद्र फडणवीसांचं गुजरातमध्ये वक्तव्य
दुख:द! साईंच्या चरणी नमस्कार करण्यासाठी वाकला अन् हृदयविकाराचा झटका आला; तरुणाचा मृत्यू

व्हिडिओ

ताज्या बातम्या
लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : मासिक पाळी बंद होण्याचा काळ कोणता?
“‘अरे’ ला ‘कारे’ करण्याची हिंमत असती तर भाजपावाल्यांनी…”; शिवसेनेचा BJP सहीत CM शिंदेंवर हल्लाबोल
मुंबई: शिवरायांच्या जन्मस्थळाबाबत भाजप आमदाराचे अज्ञान; विरोधी पक्ष आक्रमक झाल्याने दिलगिरी
मुंबई: राज्य औषध व्यवसाय परिषदेला राजकीय कुरघोडीची बाधा
दुर्धर व्याधीग्रस्त रुग्णांसाठी जिल्हास्तरावर विशेष उपचार केंद्र; रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न