अमेरिकेतील गोपनीय माहिती फोडणारा एडवर्ड स्नोडेन याने आता अधिक काळ रशियात वास्तव्य करू नये, असे स्पष्ट संकेत रशियातील अधिकाऱ्यांनी दिले आहेत. स्नोडेनने आश्रयासाठी दुसरा देश शोधावा, असे रशियाने स्पष्ट केल्याचे सांगण्यात येत आहे.
स्नोडेनने सध्या मॉस्को विमानतळावर आश्रय घेतला असून यापुढेही त्याला आश्रय देण्याची रशियाची इच्छा नाही. राजकीय आश्रय देण्याची मागणी स्नोडेनने केलेली नाही, असेही रशियाच्या अधिकाऱ्यांना हवाला देऊन सांगण्यात येत आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादमिर पुतिन यांनी स्नोडेनला अमेरिकेच्या हवाली केलेले नाही, मात्र यामुळे दोन देशांमध्ये राजकीय तणाव निर्माण होऊ नये, अशी इच्छा असल्यानेच स्नोडेनला यापुढे आश्रय देण्याची इच्छा नसल्याचे रशियाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.