अर्थव्यवस्थेलाही फटका!
चेन्नईतील पाऊस हा हवामान बदलाचा परिणाम असून ही घटना नगर नियोजकांचे डोळे उघडणारी आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. या पावसाने अर्थव्यवस्थेलाही फटका बसणार असल्याचे संकेत देण्यात येत आहे.
चेन्नई हे शहर भारतातील आउटसोर्सिगचे केंद्र आहे व परदेशी गुंतवणुकीचे मोठे ठिकाण आहे. आताच्या स्थितीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.
वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिटय़ूटचे भारतविषयक विभागाचे प्रमुख नम्बी अप्पादुराई यांनी सांगितले की, चेन्नईत गेले सतरा दिवस पाऊस पडत असून टोकाचे हवामान आहे, तो तापमानवाढीचा परिणाम आहे. अशा घटनांमधून काहीतरी धडा घेणे आवश्यक असते. हे एल निनो वर्ष असल्याने त्याचा परिणाम म्हणूनही हा पाऊस पडला आहे. ट्विटर, व्हॉटसअ‍ॅप, फेसबुकचा वापर चांगल्या प्रकारे करण्यात आला, ही स्वागतार्ह बाब आहे. मिशीगन विद्यापीठातील संज्ञापनाचे प्राध्यापक अश्विन पुणतांबेकर यांनी सांगितले की, दोन दिवसात चेन्नईच्या नागरिकांनी ५ लाख ट्विट संदेश पाठवले. त्यामुळे पायाभूत सुविधा उपलब्ध करणे शक्य झाले.