काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सुरू असलेल्या गोंधळात आता प्रियंका गांधी यांना पक्षप्रमुख करण्याची मागणी समोर येत आहे. आसाममधील काँग्रेस खासदार अब्दुल खालिक यांनी प्रियंका गांधी वाड्रा यांना काँग्रेस अध्यक्ष करण्याची मागणी केली आहे. खालिक यांनी युक्तिवाद केला आहे की, प्रियंका या सध्या वाड्रा कुटुंबाची सून असल्याने त्या भारतीय परंपरेनुसार त्या गांधी कुटुंबाच्या सदस्य आहेत असे म्हणता येणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष बनण्यास नकार दर्शवल्याने मी प्रियंका यांना अध्यक्षपदाच्या सर्वोत्तम उमेदवार मानतो. कारण, त्या आता वाड्रा कुटुंबाच्या सून असल्याने, भारतीय परंपरेनुसार गांधी कुटुंबाच्या सदस्य नाहीत.” असं बारपेटा येथील काँग्रेस खासदार अब्दुल खालिक यांनी म्हटलं आहे.

नंतर ते म्हणाले, “काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून ही माझी भावना आहे. आमच्या पक्षाचा अध्यक्ष कोण होणार हे कार्यकर्ते ठरवतील. इतर कोणीही ठरवू शकत नाही. कार्यकर्त्यांची भावना आहे की जर राहुल गांधी अध्यक्ष होत नसतील तर प्रियंका गांधी व्हाव्यात.”

राजस्थानमधील घडामोडीनंतर, गेहलोत यांच्या निवडणूक लढविण्याबाबत साशंकता कायम आहे, तर बंडखोर गटातील नेते शशी थरूर यांनी निवडणूक लढवणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे. अखेरच्या दिवशी, ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता थरूर उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: So priyanka gandhi can become congress president congress mps statement msr
First published on: 29-09-2022 at 11:58 IST