पृथ्वीवर उद्या धडकणार सौर ज्वालांचे वादळ, उपग्रहांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता

गेल्या काही महिन्यातील सर्वात मोठा स्फोट सूर्यावर झाला आहे, अत्यंत प्रभावी असा सौर ज्वालांचा उद्रेक झाला आहे

Solar Flares

सूर्यावर सातत्याने स्फोट होत असतात, या स्फोटांमुळे विविध माध्यमातून ऊर्जा ही सर्व बाजुंना सतत फेकली जात असते. प्रकाश हा त्यापैकीच एक. हे स्फोट सूर्याच्या आतमध्ये आणि भुपृष्ठावर होत असतात. तर कधी कधी याची तीव्रता एवढी प्रचंड असते की स्फोटापासून तयार झालेल्या सौर ज्वालांची तीव्रता ही कित्येक कोटी किलोमीटर अंतरापर्यंत प्रभावी ठरते.

असाच एक मोठा स्फोट २८ ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय वेळेनुसार ११ वाजून ३५ मिनीटानी नोंदवण्यात आला. सूर्याचा अभ्यास करणाऱ्या नासाच्या ‘सोलर डायनामिक्स ऑब्झर्वेटरी’ ( Solar Dynamics Observatory ) या कृत्रिम उपग्रहाने त्या स्फोटाची नोंद केली. या उपग्रहाने पाठवलेल्या माहितीचे विश्लेषण केले असता गेल्या काही महिन्यातील सूर्यावर नोंद झालेल्या सर्वात मोठ्या स्फोटापैकी हा एक स्फोट असल्याचं लक्षात आलं आहे.

या स्फोटापासून तयार झालेल्या सौर ज्वाला या अत्यंत प्रभावी असल्याचंही लक्षात आलं आहे. या सौर ज्वाला या चुंबकीय कणांच्या स्वरुपात पृथ्वीवर आदळणार आहेत. अर्थात याचा पृथ्वीला किंवा पृथ्वीवरील जीवसृष्टीला कोणताही धोका नाही. कारण पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणामध्ये ही धडक पचवण्याची क्षमता आहे. पण यामुळे चुंबकीय वादळ पृथ्वीभोवती तयार होऊ शकतं. याचाही पृथ्वीवर परिणाम होणार नसला तरी पृथ्वीभोवती फिरणाऱ्या कृत्रिम उपग्रहापासून येणाऱ्या सिग्नलवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः जीपीएस सिग्नलवर याचा परिणाम होणार का याकडे लक्ष ठेवलं जाणार आहे.

हा सर्व प्रभाव फक्त काही तास रहाण्याची शक्यता आहे. यामुळे ३० ऑक्टोबर म्हणजे उद्याचे काही तास हे महत्त्वाचे ठरणार आहेत. या विषयावर संशोधन करणारे, काम करणारे तंत्रज्ञ -अभ्यासक हे पृथ्वीवर धडकणाऱ्या सौर ज्वाला आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या परिणामांवर, उपग्रहांपासून येणाऱ्या सिग्नलवर लक्ष ठेवून असतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Solar flares to hit earth tomorrow likely to affect satellite performance asj