north korea उत्तर कोरियानं अण्वस्त्र नष्ट करावी यासाठी सिंगापूरमध्ये शिखर बैठकीचं आयोजन करण्यात आलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सकाळी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची भेट घेतली. गेल्या वर्षभरापासून किम जोंग उन यांची बेताल वक्तव्य, क्षेपणास्त्रं डागण्याच्या धमक्या, उत्तर कोरियाकडून घेतली गेलेली अण्वस्त्र चाचणी यामुळे अनेक देश चिंतेत आहे. किम जोंग तिसऱ्या महायुद्धास कारणीभूत ठरणार की काय या चिंतेनं जग ग्रासलं आहे. यासगळ्या परिस्थितीमुळे आतापर्यंत कोणासही फारसा परिचयाचा नसलेला हा उत्तर कोरिया देश पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
खरं तर आजही पाश्चात्य देशांशी या देशाचे फारसे संबंध आलेच नाहीत. त्यातून काही आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमातून ऐकीव आणि काही अंशी दाखवण्यात आलेल्या भडक गोष्टींमुळे किमचा हा देश सगळ्यांच्या कुतूहलाचा विषय ठरला आहे. इथे पूर्वी राहून गेलेल्या काही पत्रकारांनी या देशातील अनेक आणि आतापर्यंत माहिती नसलेल्या गोष्टी जगासमोर आणल्या. त्यामुळे या देशातील लोकांविषयी साहनभूती तर किम विषयी भीती आणि चीड लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. हा देश नेमका कसा आहे? याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. यातल्या अनेक गोष्टी या तिथे राहिलेल्या काही व्यक्तीच्या अनुभवातून समोर आल्या आहेत.
वृत्तनिवेदिकेने ट्रम्प यांना हुकूमशहा म्हटले, लाइव्ह कार्यक्रमात मागावी लागली माफी
– दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस कोरिया जपानच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. पण देशाची फाळणी होऊन उत्तर व दक्षिण कोरियात १९५० ते १९५३ या काळात युद्ध झाले. हे युद्ध थांबल्यावर ३८ अंश रेखांश (थर्टीएट्थ पॅरलल) ही सीमारेषा ठरली आणि त्याजवळच्या पॅनमुंजॉम या गावात युद्धबंदी करार झाला. मात्र, अधिकृतरीत्या कोरियन युद्ध अद्याप संपलेले नाही आणि ही सीमाही मान्य झालेली नाही. या युद्धात जवळपास ८० टक्के कोरिया उद्ध्वस्त झाला होता. त्यामुळे उत्तर कोरियाला सतत अस्तित्वाची भीती वाटते. त्यामुळे आपल्या हाती जगाला नमवण्यासाठी अणवस्त्रे असावी असं किम जोंग उनला वाटलं असेल तर नवल वाटायला नको.
– संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेने २१ मार्च २०१३ रोजी उत्तर कोरियामध्ये नागरिकांवर सुरू असलेल्या अत्याचाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती. किम जोंगनं वडिलांच्या मृत्यूनंतर सत्ता हातात घेतल्यावर कसे अत्याचार केले याची माहिती समितीच्या अहवालात देण्यात आली आहे. या अहवालानुसार येथे एक लाखांहून अधिक राजकिय कैद्यांवर कसे अनन्वित अत्याचार केले हे जगासमोर आणलं गेलं. हिच गत महिलांबाबतही असल्याचं या अहवालातून समोर आलं आहे.
– चीन आणि उत्तर कोरिया या देशांचे संबध चांगले आहेत, त्यामुळे चीनमधील प्रगतीला, तेथील रोजगारसंधींना भुलून किंवा उत्तर कोरियातून सुटण्यासाठी गेल्या १२ वर्षांत तब्बल २५ हजारांहून अधिक उत्तर कोरियन लोक या ना त्या मार्गाने चीनमध्ये आले, पण त्यापैकी अनेकांना चीनने परत धाडले. ही सक्तीची परतपाठवणी झाल्यावर अशा अनेकांची रवानगी तुरुंगांमध्ये करण्यात आली आहे.
Donald trump Kim jong Un summit: किम जोंग उन यांचा पहिलावहिला सेल्फी बघितला का?
– उत्तर कोरियातील नागरिकांवर इंटरनेटच्या वापराबाबतही निर्बंध घालण्यात आल्याचं यापूर्वीही अनेक प्रसार माध्यमांनी म्हटलं आहे. उत्तर कोरियाला चीन हा एकमेव देश इंटरनेट सेवा पुरवायचा त्यानंतर आता रशियानंदेखील इंटरनेट सेवा पुरवण्यास सुरूवात केल्याचं वॉशिंग्टन पोस्टनं म्हटलं आहे.
– फक्त काही महत्त्वाच्या व्यक्तीच येथे इंटरनेट वापरू शकतात. इंटरनेटचा वापर मर्यादित असून सर्वसामान्यांनी मात्र इंटरनेट वापरण्यास बंदी असल्याचं य़ापूर्वीही अनेकांनी मान्य केलं आहे.
– साधरण तीन वर्षांपूर्वी महिला आणि पुरूषांच्या केशरचनेसंदर्भात या देशानं अजब फतवा काढला होता. या निर्णयानुसार देशातील पुरूषांना किमजोंग-उन यांच्याप्रमाणेच केशरचना ठेवावी तर महिलांनी किम जोंग-उन यांच्या पत्नीच्या केशरचनेचे अनुकरण करवं असं म्हटलं होतं. दक्षिण कोरियाचे राष्ट्रीय वृत्तपत्र असलेल्या ‘चोसून इल्बो’नं सर्वप्रथम ही माहिती जगासमोर आणली होती.