काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या घरी तोडफोड आणि जाळपोळ!

सलमान खुर्शीद यांनी घराला आग लागल्याचे फोटो फेसबुकर स्वतः शेअर केले आहेत

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या घराला तोडफोड करून आग लावण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सलमान खुर्शीद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकावरून सध्या मोठा वाद सुरू झाला आहे. या पुस्तकात सलमान खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना बोको हराम किंवा आयसिससोबत केल्याची टीका केली जाऊ लागली आहे. तसेच या मुद्द्यावरून भाजपाने देखील आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

दरम्यान सलमान खुर्शीद यांनी स्वतः फेसबुकवर त्यांच्या नैनीताल येथील घराला आग लागल्याचे फोटो तसेच घराच्या काचा फोडण्यात आल्याचे फोटो शेअर केले आहेत. यामुळे आता राजकीय वातावरण चांगलच तापणार असल्याचं दिसत आहे.

फेसुबक पोस्टमध्ये सलमान खुर्शीद म्हणतात, ”मी आता देखील चुकीचा आहे का? हे हिंदुत्व असू शकतं का? तसेच, तर आता अशी चर्चा आहे. लाच हा अतिशय कमकुवत शब्द आहे. याशिवाय मला आताही आशा आहे की आपण एकदिवस एकत्रितपणे चर्चा करू आणि असहमत असल्यास सहमत होऊ शकतो. असं देखील ते दुसऱ्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.”

याप्रकरणी राकेश कपिल आणि अन्य २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती कुमाऊचे डीजीआय नीलेश आनंद यांनी दिली आहे.

हिंदुत्वाची तुलना आयसीस आणि बोको हरामशी केल्याच्या आरोपांवर सलमान खुर्शीद यांचं स्पष्टीकरण; म्हणाले…

संभलमध्ये आयोजित कार्यक्रमात काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद म्हणाले की, “दहशतवादी संघटना आयसीस आणि हिंदुत्व एकच आहेत असे मी माझ्या पुस्तकात म्हटले नाही. पण दोन्ही एकसारख्या आहेत, असं मी म्हटलंय. ISIS आणि बोको हराम इस्लाम धर्माचा गैरवापर करतात, असंही मी म्हटलंय. परंतु इस्लामच्या अनुयायांपैकी कोणीही यावर आक्षेप घेतला नाही. मी त्यांच्या धार्मिक भावना दुखावत आहे, असे कोणीही म्हटले नाही.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Some people vandalized residence of former union minister congress leader salman khurshid in nainital today msr

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या