Hindenburg Research : गेल्या वर्षी अमेरिकेतील शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने अदाणी समूहावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर उद्योगविश्वात मोठी खळबळ उडाली होती. त्यावेळी या आरोपांचा गंभीर परिणाम अदाणी समूहातील कंपन्यांच्या शेअर्सवरही झाला होता. दरम्यान, आता हिंडनबर्ग रिसर्चने आज पुन्हा एकदा भारतीय कंपनीबाबत मोठा खुलासा करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.

हिंडेनबर्ग रिसर्चची एक्स या समाज माध्यमावर पोस्ट

हिंडेनबर्ग रिसर्चने एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत पुन्हा मोठा खुलासा करणार असल्याचे संकेत दिले आहेत. भारतात लवकरच काहीतरी मोठं घडणार, असं त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मात्र, ते नेमका कोणता खुलासा करणार याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. हिंडनबर्ग रिसर्चच्या या पोस्टनंतर उद्योग विश्वातही मोठी खळबळ उडाली आहे. याचा परिणाम सोमवारी शेअर बाजारावरही होण्याची शक्यता आहे.

fineotex chemical ltd marathi news
माझा पोर्टफोलियो : पटीपटीने वाढीच्या गुणाकाराचे ‘रसायन’
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Gautam Adani Sebi chief Madhabi Buch
Hindenburg : “…म्हणून सेबीने अदाणींच्या घोटाळ्याप्रकरणी कारवाई केली नाही”, हिंडेनबर्गचा आणखी एक धमाका
Cyber Crime
Cyber Crime : सॉफ्टवेअर इंजिनिअर जोडप्याची १.५३ कोटींची फसवणूक, गोल्डन अवर्समधील कारवाई, ५० खाती गोठवली अन्…! पोलिसांनी कसा काढला युकेतील स्कॅमरचा माग?
Hindenburg Research Updates in Marathi
Hindenburg Research : हिंडेनबर्गप्रकरणी अर्थ मंत्रालयाकडून पहिली प्रतिक्रिया, सेबी आणि माधबी पुरी बुचबाबत म्हणाले…
Vinesh Phogat What Reason Told to Court on Reason Behind Increased Weight
Vinesh Phogat: विनेशने अंतिम सामन्यापूर्वी वजन वाढण्यामागे कोर्टात काय कारण सांगितलं? फोगटच्या वकिलांनी असा केला युक्तिवाद
Atal Setu Viral Video
Atal Setu Viral Video : अटल सेतूवर थरार; रेलिंगच्या पलिकडे उतरलेल्या महिलेला पोलिसांनी वाचवलं, जबानीत म्हणाली, “मी तर…”
Hindenburg Research Madhavi Buch
Hindenburg Research : हिंडेनबर्गचे आरोप सेबीच्या अध्यक्षा माधवी बुच यांनी फेटाळले; म्हणाल्या, “सेबीमध्ये सामील होण्याच्या दोन वर्षांपूर्वी…”

हेही वाचा- ‘एलआयसी’चे भाग गुंतवणुकीचे मूल्य १५ लाख कोटींपुढे; सव्वा तीन वर्षात दुपटीहून अधिक वाढ

हिंडेनबर्ग रिसर्च अदाणी समूहात घोटाळे सुरू असल्याचा केला होता आरोप

दरम्यान, हिंडेनबर्ग रिसर्चने २४ जानेवारी २०२३ रोजी अदाणी समूहात गत कैक वर्षांपासून घोटाळे सुरू आहेत, असा आरोप करणारा अहवाल जाहीर केला होता. त्यानंतर अदाणी समूहातील कंपन्यांचे समभागांची भांडवली बाजारात पडझड सुरू झाली होती. एकंदर १२५ अब्ज डॉलरच्या आसपास समूहाच्या बाजारमूल्याचे पतन झाले होतं.

हेही वाचा – बँक खात्याला चौघांचे नामनिर्देशन शक्य; लोकसभेत बँकिंग सुधारणा विधेयक सादर

उद्योगपती गौतम अदाणी यांच्या मालकीच्या अदानी समूहातील कंपन्यांविषयी हिंडेनबर्ग रिसर्चने १०६ पानी अहवालात अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले होते. अदाणी समूहातील कंपन्यांनी भांडवली बाजारात आपल्या समभागांचे भाव फुगवल्याचा दावा या अहवालात करण्यात आला होता. तसेच अदाणी समूहाने बोगस कंपन्या स्थापन करून त्यांच्या माध्यमातून गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोपही हिंडेनबर्गने केला होता. कंपनीने क्षमतेपेक्षा अधिक कर्ज घेतले असून, हे कर्ज मिळवण्यासाठी कंपनीने समभागांचे मूल्य फुगवून दाखवले, असा ठपका अहवालात ठेवण्यात आला होता.