भारतात मोटर सायकलवर पर्यटनासाठी आलेल्या स्पॅनिश महिलेवर झारखंडच्या डुमका जिल्ह्यात सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पीडित महिला आपल्या पतीसह मोटर सायकल ट्रिपवर निघाली आली असताना ही घटना घडली. बिहारमधल्या भागलपूर येथे जात असताना त्यांनी झारखंडच्या डुमकी मार्केटनजीक एका निर्जन स्थळावर तंबू ठोकून रात्रीचा मुक्काम करण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान पीडितेवर अत्याचार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या जोडप्याला मारहाणदेखील झाली. या घटनेप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. आता या महिलेने एक पोस्ट लिहून आपल्या दुःखाला वाट मोकळी करुन दिली आहे.

काय म्हटलं आहे पीडित महिलेने?

“मी आणि माझा पती आम्ही दोघेही रुग्णालयात आहोत. जो प्रकार आमच्याबरोबर घडला तो कधीही कुणाबरोबरही घडू नये असंच वाटतं आहे. सात जणांनी माझ्यावर बलात्कार केला. त्यानंतर मला आणि माझ्या पतीला मारहाण केली. आम्हाला लुटलं, आमच्या सगळ्या गोष्टी त्यांनी हिसकावल्या पण त्यांनी आमचं ऐकून घेतलं नाही. कारण त्या सगळ्यांना माझ्यावर बलात्कार करायचा होता. भारतात ही घटना घडली आहे. आम्हाला पोलिसांनी रुग्णालयात आणलं आहे.” स्पॅनिश महिला व्लॉगरने ही पोस्ट तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे.

Accused in gang rape case
सामूहिक बलात्कार प्रकरणातील नऊ वर्ष पसार असलेल्या आरोपीला अटक
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप
terrorist attack
अन्वयार्थ: भीषण हल्ल्यातही युद्धाची खुमखुमी?

ही महिला पुढे म्हणते, “जे हल्लेखोर होते त्यांनी माझ्या आणि माझ्या पतीचे मानेवर सुरा ठेवला होता. ते एकूण सात लोक होते. माझ्यावर बलात्कार करुनच ते थांबले नाहीत. त्यांना माझी हत्या करायची होती.”

नेमकी घटना काय घडली?

या जोडप्यावर काही स्थानिक टोळक्याची नजर पडली. त्यांनी स्पॅनिश जोडप्याची छेडछाड केली आणि त्यानंतर महिलेवर बलात्कार केला. या घटनेनंतर ३५ वर्षीय पीडित महिलेने गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला थांबवून तिच्यावर घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली. शुक्रवारी (दि. १ मार्च) रात्री १० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी पीडित महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

हे पण वाचा- झारखंडमध्ये स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार; पर्यटन करण्यासाठी पती-पत्नी आले होते भारतात

डुमका जिल्ह्याचे शल्यचिकित्सक बी. पी. सिंह यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, एका विदेशी महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची माहिती मला मिळाली. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यास मला सांगितले गेले. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदविला असून एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीनुसार सदर महिलेचे वय ३५ असल्याचीही माहिती त्यांनी दिली. आता या महिलेची आपबिती समोर आली आहे.