Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी, राज कुशवाहा या दोघांनाही राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह आणखी सहा आरोपी आहेत ज्यांना या प्रकरणात अटक झाली आहे. २० मे रोजी सोनम आणि राजा रघुवंशी हे नवविवाहित दाम्पत्य हनिमूनसाठी इंदूरहून बंगळुरुला गेलं. त्यानंतर ते दोघंही गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात गेले. गुवाहाटीहून दोघं हनिमूनसाठी मेघालयात गेले होते. इस्ट खासी हिल्स या ठिकाणाहून दोघं २३ मे रोजी बेपत्ता झाले होते. २ जून रोजी राजाचा मृतदेह सापडला. राजाची हत्या सोनमनेच घडवून आणली. त्यात तिला तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाहाने साथ दिली होती अशी माहिती समोर आली. या प्रकरणात आता नवा पैलू समोर आला आहे. राज कुशवाहा आणि सोनमचं लग्न झाल्याचा दावा राजा रघुवंशीच्या भावाने केला आहे.
राजा रघुवंशीच्या भावाचा दावा काय?
गुरुवारी माध्यमांशी बोलताना राजा रघुवंशीचा मोठा भाऊ म्हणाला राजाची हत्या केल्यानंतर सोनम फरार झाली होती. त्या दरम्यान राज कुशवाहा आणि सोनम यांनी लग्न केलं असावं अशी शक्यता आहे. कारण मेघालय पोलिसांना सोनमची दोन मंगळसुत्रं मिळाली आहेत. सोनमची दोन मंगळसुत्रं आहेत त्यापैकी एक तर राजा कुशवाहाने तिच्या गळ्यात घातलं होतं. पण दुसरं मंगळसुत्र हे राज कुशवाहाशी लग्नानंतर तिने परिधान केलं असावं असा विश्वास मला वाटतो आहे. आम्हाला आज माहिती मिळाली आहे की पोलिसांना दोन मंगळसुत्रं सापडली आहेत. ११ मे रोजी राजाने तिच्यासाठी एक मंगळसूत्र केलं होतं हे आम्हाला माहीत आहे. सोनम जेव्हा राजाची हत्या घडवून आणल्यानंतर फरार झाली त्यानंतरच्या काही दिवसांत या दोघांनी लग्न केलं असावं अशी शक्यता आहे. राजा रघुवंशीचा भाऊ विपिन याने पीटीआयशी बोलताना हा दावा केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवा पैलू समोर आला आहे.

विपिनने सोनमच्या भावाबाबत काय म्हटलं आहे?
विपिनने सोनमचा भाऊ गोविंदबाबतही एक दावा केला आहे. राजाचा मृतदेह सापडला तेव्हा सोनमचा भाऊ गोविंद हा आमच्या घरी येऊन रडला होता. त्याने आम्हा सगळ्यांची माफी मागितली. आता गोविंद म्हणतो आहे की त्याला सोनमला भेटायचं आहे. सोनमसाठी त्याने वकीलही दिला आहे. जर त्याला हे सगळं करायचं होतं तर मग आमच्या घरी येऊन रडला कशाला? आमच्या कुटुंबाशी त्याने भावनिक खेळ केला आहे असा आरोप विपिनने केला आहे. टाइम्स नाऊने हे वृत्त दिलं आहे.
२३ मे रोजी राजाची हत्या कशी झाली?
२३ मे रोजी राजा आणि सोनम हे दोघंही शिपारा होम स्टे या ठिकाणी आले. पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी या दोघांनी चेक इन केलं. त्यानंतर सहा वाजण्याच्या सुमारास राजा आणि सोनम हे दोघंही ट्रेकला जाण्यासाठी तयार झाले. याचवेळी सोनमने ज्या तिघांना राजाच्या हत्येची सुपारी दिली होती ते तिघेही जवळच्या एका होम स्टेमध्ये राहिले होते. साधारण १० वाजण्याच्या सुमारास सोनम आणि राजाने ट्रेक करत असताना २ हजार पायऱ्यांचं अंतर पार केलं. त्याआधी त्यांची भेट आनंद, आकाश आणि विशाल यांच्याशी झाली होती. साधारण १० वाजण्याच्या सुमारास राजा, सोनम, आकाश, विशाल आणि आनंद या पाचही जणांना अल्बर्ट या टुरिस्ट गाईडने पाहिलं होतं. अल्बर्टने दिलेल्या जबाबामुळेच सोनमच यामागे असावी हे पोलिसांच्या लक्षात आलं आणि त्या अनुषंगाने त्यांनी तपासाची चक्रं फिरवली. या टुरिस्ट गाईने दिलेल्या माहितीनुसार सोनम या चार जणांच्या मागून चालत होती तर तिच्या चालण्याचा वेग थोडा मंदावला होता. दुपारी १२.३० च्या दरम्यान सोनमने राजाची आई उमा रघुवंशी यांना फोन केला. मी खूपच दमले आहे आणि उपास ठेवला आहे असं तिने सासूला म्हणजेच राजाच्या आईला सांगिलं. त्यावेळी उमा रघुवंशी राजाशीही बोलल्या. राजाशी हा आपला शेवटचा संवाद आहे हे तेव्हा त्यांना मुळीच वाटलं नव्हतं. साधारण आणखी अर्ध्या तासाने दुपारी १ ते १.३० च्या सुमारास हे पाचही जण मावलखियाट या ठिकाणाहून वेई सावदोंग धबधब्याच्या दिशेने निघाला. त्यावेळी सोनलने या तिघांना इशारा केला ज्यानंतर राजाच्या डोक्यावर चाकू हल्ला करण्यात आला. राजाची हत्या करण्यात आली तेव्हा सोनम तिथेच उपस्थित होती. राजाच्या हत्येनंतर सोनमने राजाच्या मोबाइलवरुन सात जन्मो का साथ असं लिहून एक सोशल मीडिया पोस्ट केली. दुपारी २.३० च्या दरम्यान राजाचा मृतदेह दरीत फेकण्यात आला. असा घटनाक्रम राजाला ठार करण्याआधी घडला होता.