Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी या दोघांचं लग्न ११ मे रोजी झालं होतं. त्यानंतर हे दोघंही २० मे रोजी मधुचंद्रासाठी गेले होते. २२ मेपर्यंत हे दोघंही त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात होते. मात्र २३ मे पासून त्यांचा संपर्क तुटला. सुरुवातीला हे दोघंही बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली. त्यानंतर २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला. त्यानंतर ७ दिवसांनी म्हणजेच ९ जून रोजी सोनम पोलिसांना शरण आली. सोनमनेच राजाच्या हत्येचा कट रचला होता ही बाब समोर आली. त्या दिवसापासूनच आता या प्रकरणात रोज नवे पैलू समोर येत आहेत. अल्बर्ट पीडी या गाईडने दिलेल्या महत्त्वाच्या माहितीनंतरच सोनम प्रकारणात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागला.

कोण आहे अल्बर्ट पीडी?

अल्बर्ट पीडी हा शिलाँगचा टुरिस्ट गाईड आहे. त्याने पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली. पोलिसांना त्याने सांगितलं की सोनम आणि राजा यांच्यासह तिघांना त्याने पाहिलं होतं. नोंग्रियाट ते मावलखियाट या ठिकाणी हे तिघंही राजा आणि सोनम यांच्यासह तीन हजार पायऱ्या चढून गेले होते. गाईडने दिलेल्या माहितीनुसार राजा आणि इतर तिघे हे समोर चालले होते तर सोनम ही या चौघांच्या मागे होती. सगळे हिंदीत बोलत होते. अल्बर्टने पोलिसांना हेदेखील सांगितलं की त्याला हिंदी समजत नाही. पण काहीतरी गडबड आहे असा संशय त्याला आला होता. यानंतर पोलीस आणखी सावध झाले आणि त्यांनी या हत्येमागे सोनम तर नाही ना? हा पैलू तपासण्यास सुरुवात केली. ज्यानंतर सोनम रघुवंशीच या घटनेच्या मागे असल्याची बाब पोलिसांच्या लक्षात आली. मेघालय पोलिसांनी यासंदर्भातल्या मोहिमेला ऑपरेशन हनिमून असं नाव दिलं आहे.

ऑपरेशन हनिमून

ऑपरेशन हनिमूनच्या अंतर्गत १२० पोलीस कर्मचारी कार्यरत होते. पोलिसांना या गोष्टीचाही संशय आला की हनिमूनला आलेल्या सोनमने सोनम आणि राजाचा एकही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला नाही. नवविवाहीत जोडपं आणि सोशल मीडियावर पत्नीने एकही फोटो पोस्ट केला नाही ही बाब पोलिसांना नॉर्मल वाटली नाही. कारण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बहुतांश हनिमून कपल्स ही हनिमूनला आल्यानंतर ज्या प्रेक्षणीय ठिकाणांना भेट देतात तिथले फोटो आवर्जून सोशल मीडियावर पोस्ट करतात. सोनमने शिलाँगला आल्यानंतर तिचा आणि राजाचा एकही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला नाही ही बाब पोलिसांना खटकली होती.

२३ मे रोजी राजाच्या अकाऊंवटरुन भावूक पोस्ट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २३ मेच्या दुपारी २ वाजून १५ मिनटांनी एक सोशल मीडिया पोस्ट करण्यात आली. ज्यात लिहिलं होतं सात जन्मांची साथ. ही पोस्ट तेव्हा करण्यात आली जेव्हा राजाची हत्या झाली होती. पोलिसांचा दावा आहे की ही पोस्ट सोनमनेच केली असावी आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. राजा जिवंत आहे असं भासवण्याचा प्रयत्न तिने यातून केला असावा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपींच्या बरोबर दिसली सोनम रघुवंशी

पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु असताना एक सीसीटीव्ही फुटेज त्यांच्या हाती लागलं. ज्यामध्ये आकाश, विशाल आणि आनंद या आरोपींसह सोनम दिसते आहे. ही जागा राजाचा मृतदेह जिथे सापडला तिथून १० किमी अंतरावर सोनम आरोपींसह दिसली होती. पोलिसांनी सांगितलं की सोनमने तिचा रेनकोट जाणीवपूर्वक आकाशला दिला होता. त्यावर रक्ताचे डाग होते. हा रेनकोट हत्या झालेल्या ठिकाणापासून ६ किमी अंतरावर झुडुपांमध्ये फेकण्यात आला. राजाप्रमाणेच सोनम बरोबरही काहीतरी दुर्घटना घडली असावी असा संशय पोलिसांना यावा यासाठी तिने हे केलं होतं. असाही दावा पोलिसांनी केला आहे, आज तकने हे वृत्त दिलं आहे.