सोनियांची काँग्रेसच्या राज्यसभा सदस्यांशी राजकीय स्थितीवर चर्चा

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा

. (संग्रहित छायाचित्र)

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी पक्षाच्या राज्यसभेतील खासदारांची बैठक घेऊन सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.

दूरचित्रसंवादाद्वारे आयोजित केलेल्या या बैठकीत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह ए. के.अ‍ॅण्टनी, अहमद पटेल, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, मल्लिकार्जुन खरगे, अंबिका सोनी, पी. चिदम्बरम आणि जयराम रमेश आदी ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते. या बैठकीत खासदारांनी आर्थिक स्थिती व देशातील करोनाबाधितांची वाढणारी संख्या याबाबत चिंता व्यक्त केली. सोनिया यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेतील खासदारांची बैठक आयोजित केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sonia discusses political situation with congress rajya sabha members abn

ताज्या बातम्या