सोनिया गांधींनी स्वीकारला कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा

निवडणूक आयोगाने नोंदणी केल्यानंतर आणि मतदान चिन्ह वाटप केल्यानंतर सिंग यांच्या ‘पंजाब लोक काँग्रेस’ची औपचारिक सुरुवात केली जाईल.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा स्वीकारला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन) के सी वेणुगोपाल यांनी बुधवारी सांगितले. सिंग यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्यावर ‘षडयंत्र’ रचल्याचा आरोप करत काँग्रेसचा राजीनामा दिला होता.

अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या नवीन पक्षाच्या नावाच्या घोषणेसह राजीनाम्याची घोषणा केली होती. निवडणूक आयोगाने नोंदणी केल्यानंतर आणि मतदान चिन्ह वाटप केल्यानंतर ‘पंजाब लोक काँग्रेस’ची औपचारिक सुरुवात केली जाईल. वेणुगोपाल यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, माननीय काँग्रेस अध्यक्षांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा स्वीकारला आहे.

सिंग यांनी ट्विटरवर सार्वजनिक केलेल्या सोनिया गांधींना लिहिलेल्या सात पानांच्या पत्रात पंजाब काँग्रेसचे नवे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना पाकिस्तानचे सहकारी म्हणून संबोधलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sonia gandhi accepts ex punjab cm amarinder singh resignation from congress vsk

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या