Sonia Gandhi Health Update: काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रविवारी रात्री दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने सदर वृत्त दिले आहे. पोटाच्या समस्येमुळे त्यांना रुग्णालयातील गॅस्ट्रो विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सर गंगाराम रुग्णालयाने निवेदन जाहीर करत त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. “काँग्रेस नेत्या यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटाची समस्या असल्यामुळे त्या सध्या गॅस्ट्रो विभागात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवण्यात येत आहे”, असे निवेदन रुग्णालयाने एएनआय वृत्तसंस्थेला दिले आहे.

मागच्या आठवड्यात शिमला येथील दौऱ्यात सोनिया गांधी यांना आरोग्याची समस्या जाणवत होती. त्यांना शिमलामधील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज (आयजीएमसी) रुग्णालयात आणण्यात आले होते. तिथे काही तपासण्या केल्यानंतर त्या घरी गेल्या. आयजीएमसीचे उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमन चौहान यांनी सांगितले की, त्यांच्या नियमित तपासण्या करण्यासाठी रुग्णालयात आणले गेले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात, ७८ वर्षीय सोनिया गांधी यांना पोटाच्या आजारामुळे दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.