Sonia Gandhi Autobiography Belonging: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या बहुप्रतीक्षित आत्मचरित्राच्या प्रकाशनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. पेंग्विन रँडम हाऊस इंडियासोबतचा प्रकाशन करार फिस्कटल्यानंतर आता हार्परकॉलिन्स इंडिया हे पुस्तक प्रकाशित करणार आहे. Belonging: A Journey of Love असे या आत्मचरित्राचे नाव असून, १० नोव्हेंबर २०२६ रोजी ते भारतात प्रकाशित होणार आहे.

हार्परकॉलिन्स इंडियाने पुस्तकाबाबत एक्सपोस्टमधून दिली माहिती

हार्परकॉलिन्स इंडियाने ‘एक्स’वरील पोस्टद्वारे याबाबत घोषणा केली. प्रेम, ओळख, कर्तव्य आणि वैयक्तिक कहाणी मांडणारे हे पुस्तक भारताच्या प्रवासाचा दुर्मीळ दृष्टिकोन देते असे प्रकाशकाने म्हटले आहे.

हार्परकॉलिन्सची पोस्ट

पेंग्विन रँडम हाऊसबरोबर फिस्कटला करार

पुस्तकातील काही मजकुरात बदल आणि काही भाग वगळण्याच्या पेंग्विन रँडम हाऊस इंडियाच्या सूचनांना सोनिया गांधी यांनी विरोध दर्शवल्यानंतर दोघांमधील करार फिस्कटल्याचे वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांच्या १२ वर्षांच्या कार्यकाळाचे संदर्भ, आरएसएसची भूमिका, जातीय संघर्ष आणि दंगली तसेच अल्पसंख्याकांच्या परिस्थितीशी संबंधित उल्लेखांवर संपादकीय पातळीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.

दोन महिन्यांच्या चर्चेनंतर पेंग्विनबरोबरचा करार फिस्कटला

पेंग्विन रँडम हाऊस इंडिया आणि सोनिया गांधी यांच्यातील प्रकाशनाशी निगडीत करारावर दोन महिने चर्चा सुरु होत त्यानंतर हा करार फिस्कटला. प्रकाशकाने सुचवलेले काही संपादकीय बदल आणि काही भाग वगळण्याचा प्रस्ताव सोनिया गांधी यांनी नाकारल्यानंतर पेंग्विन रँडम हाऊस इंडिया या आत्मचरित्राचे प्रकाशन करणार नाही, असे वृत्त समोर आले होते. दरम्यान, आता हे पुस्तक १० नोव्हेंबर २०२६ रोजी बाजारात दाखल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.