काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम करत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ‘भारत जोडो यात्रे’ला तामिळनाडून सुरुवात झाली. ती आता केरळमधून कर्नाटकमध्ये पोहचली आहे. या यात्रेला जनतेचा देखील पाठिंबा मिळत असल्याचं दिसत आहे. त्यात आता काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी या यात्रेत सहभागी होणार आहे.

या यात्रेत सामील होण्यासाठी सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी आज ( ३ सप्टेंबर ) कर्नाटकातील म्हैसूरला पोहचतील. त्यानंतर कोडागु जिल्ह्यातील माडीकेरीजवळ येथे जाण्यापूर्वी चामुंडेश्वरी मंदिराला भेट देण्याची शक्यता आहे. मंगळवार आणि बुधवार दोन दिवस काही कारणास्तव यात्रा होणार नाही आहे. गुरुवारी मंड्या जिल्ह्यातील मेलुकोट येथे सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यात्रेत सहभागी होतील, अशी माहिती कर्नाटक प्रदेश काँग्रेसच्या नेत्या प्रियंका खरगे यांनी दिली.

हेही वाचा – हैदराबादमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या

“सत्ताधाऱ्यांनी महात्मा गांधीचा वारसा सांगणे सोपे, पण…”

दरम्यान, राहुल गांधी यांनी सोमवारी भाजपावर हल्लाबोल केला. “सत्ताधाऱ्यांनी महात्मा गांधीजींचा वारसा असल्याचा दावा करणे सोपे आहे. मात्र, महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्या विचारसणीद्वारे गेल्या आठ वर्षात देशात विषमता, विभाजनाचे राजकारण केले गेले. कष्टाने मिळवलेले स्वातंत्र्य नष्ट झाले,” अशी टीका राहुल गांधी यांनी भाजपावर केली आहे.