श्वसननलिकेत संसर्ग झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती आता सुधारत आहे. त्यांना श्वसनाचा कोणताही त्रास आता जाणवत नसून चिंतेचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी रविवारी सांगितले.
श्रीमती गांधी यांना आता बरे वाटू लागले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांच्यावर डॉक्टरांचे एक पथक लक्ष ठेवून आहे. गरज भासल्यास त्यांच्यावर काही उपचार करण्यात येतील, असे सर गंगाराम रुग्णालयाच्या श्वसनऔषध विभागाचे प्रमुख डॉ. अरुपकुमार बसू यांनी स्पष्ट केले.
सोमवारी सकाळी त्यांच्या प्रकृतीची पुन्हा एकदा तपासणी केली जाईल, असे ते म्हणाले. श्वसननलिकेत संसर्ग झाल्याने श्वसनास त्रास जाणवू लागल्याने गुरुवारी संध्याकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Dec 2014 रोजी प्रकाशित
सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत सुधारणा
श्वसननलिकेत संसर्ग झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती आता सुधारत आहे.

First published on: 22-12-2014 at 01:35 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonia gandhis health improving doctors