scorecardresearch

सोनिया आणि राहुल गांधींनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली

देशातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा आम्ही आदर करतो, असे सांगत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी शुक्रवारी स्वीकारली.

देशातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा आम्ही आदर करतो, असे सांगत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी शुक्रवारी स्वीकारली.
दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या, कॉंग्रेस पक्षाने त्यांच्या कार्यक्रमांच्या आणि धोरणांच्या आधारावर निवडणुकीत विरोधकांचा सामना केला. लोकशाही व्यवस्थेमध्ये हार आणि जीत होतच असते. यंदाचा जनादेश आमच्याविरोधात आहे आणि त्याचा आम्ही आदर करतो. मात्र, केंद्रातील नव्या सरकारने एकता आणि देशहितासोबत कोणतीही तडजोड करू नये, अशीही अपेक्षा सोनिया गांधींनी व्यक्त केली. केंद्रातील नव्या सरकारला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sonia rahul gandhi accepted their defeat

ताज्या बातम्या